मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपपाठोपाठ शिवसेनेनेही उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. शिवसेनेच्या पहिल्या यादीत युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासह 70 उमेदवारांचा समावेश आहे. अपेक्षेप्रमाणे आदित्य ठाकरेंना वरळी मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट जाहीर झालं आहे. तर एन्काऊंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा यांना नालासोपाऱ्यातून उमेदवारी मिळाली आहे.


आयारामांना उमेदवारी


स्थानिकांचा विरोध डावलून काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. उद्धव ठाकरे यांनी कालच काही उमेदवारांना मातोश्रीवर एबी फॉर्म वाटले होते, त्यामध्ये निर्मला गावित यांचाही समावेश होता.


तर काँग्रेसचा हात सोडून शिवधनुष्य हाती घेतलेल्या अब्दुल सत्तार यांनाही शिवसेनेने उमेदवारी दिली आहे. अब्दुल सत्तार यांना सिल्लोड मतदारसंघातून विधानसभेचं तिकीट देण्यात आलं आहे.


त्याशिवाय काही महिन्यांपूर्वीत राष्ट्रवादीला रामराम करुन शिवबंधन हाती बांधलेल्या जयदत्त क्षीरसागर यांनाही बीडमधून संधी मिळाली आहे. तसंच गुहागरमधून भास्कर जाधव यांना तिकीट देण्यात आलं आहे.


युतीच्या जागावाटपाचा फॉर्म्युला समोर
भाजपच्या या यादीसोबतच शिवसेना-भाजप युतीचा फॉर्म्युलाही समोर आला आहे. विधानसभा निवडणुकीत शिवसेना 124 जागांवर लढणार आहे. तसंच शिवसेनेला विधानपरिषदेच्या दोन अधिकच्या जागा दिल्या जातील. त्यामुळे भाजप आणि मित्रपक्ष 164 जागांवर लढणार आहे.


स्थानिकांचा विरोध डावलून काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या इगतपुरीच्या माजी आमदार निर्मला गावित यांना शिवसेनेकडून उमेदवारी मिळाली आहे. उद्धव ठाकरे यांनी कालच काही उमेदवारांना मातोश्रीवर एबी फॉर्म वाटले होते, त्यामध्ये निर्मला गावित यांचाही समावेश होता.


शिवसेनेची उमेदवार यादी


1. नांदेड - राजश्री पाटील
2. मुरुड - महेंद्र दळवी
3. हाडगाव - नागेश पाटील अष्टीकर
4. मुंबादेवी - पांडुरंग सकपाळ
5. भायखळा - यामिनी जाधव
6. गोवंडी - विठ्ठल लोकरे
7. एरंडोल पारोळा - चिमणराव पाटील
8. वडनेरा - प्रीती संजय
9. श्रीवर्धन - विनोद घोसाळकर
10. कोपर पाचपाखाडी - एकनाथ शिंदे
11.वैजापूर - रमेश बोरनावे
12. शिरोळ - उल्हास पाटील
13. गंगाखेड - विशाल कदम
14. दापोली - योगेश कदम
15. गुहागर - भास्कर जाधव
16. अंधेरी पूर्व - रमेश लटके
17. कुडाळ - वैभव नाईक
18. ओवळा माजीवाडा - प्रताप सरनाईक
19. बीड - जयदत्त क्षीरसागर
20. पैठण - संदीपान भुमरे
21. शहापूर - पांडुरंग बरोला
22. नागपूर शहर - अनिलभैय्या राठोड
23. सिल्लोड - अब्दुल सत्तार
24. औरंगाबाद (दक्षिण) -
25. अक्कलकुवा - आमिशा पाडवी
26. इगतपुरी - निर्मला गावित
27. वसई - विजय पाटील
28. नालासोपारा - प्रदीप शर्मा
29. सांगोला - शब्जी बापू पाटील
30. कर्जत - महेंद्र थोरवे
31. घनसंगवी - डॉ.हिकमत दादा उधन
32. खानापूर - अनिल बाबर
33. राजापूर - राजन साळवी
34. करवीर - चंद्रदीप नरके
35. बाळापूर - नितीन देशमुख
36. देगलूर - सुभाष सबणे
37. उमरगा लोहारा - ज्ञानराज चौगुले
38. दिग्रस - संजय राठोड
39. परभणी - डॉ. राहुल पाटील
40. मेहकर - डॉ. संजय रेमुलकर
41. जालना - अर्जुन खोतकर
42. कळमनुरी - संतोष बांगर
43. कोल्हापूर उत्तर - राजेश क्षीरसागर
44. औरंगाबाद (पश्चिम) - संजय शिरसाट
45. चांदगड (कोल्हापूर) - संग्राम कुपेकर
46. वरळी - आदित्य ठाकरे
47. शिवडी - अजय चौधरी
48. इचलकरंजी - सुजीत मिकानेकर
49. राधानगरी - प्रकाश आबिटकर
50. पुरंदर - विजय शिवतारे
51. दिंडोशी - सुनील प्रभू
52. जोगेश्वरी पूर्व - रवींद्र वायकर
53. मागाठणे - प्रकाश सुर्वे
54. गोवंडी - विठ्ठल लोकारे
55. विक्रोळी - सुनील राऊत
56. अणुशक्ती नगर - तुकाराम काटे
57. चेंबूर - प्रकाश फतारपेकर
58. कुर्ला - मंगेश कुडाळकर
59. कलिना - संजय पोतनिस
60. माहीम - सदा सरवणकर
61. जळगाव ग्रामीण - गुलाबराव पाटील
62. पाचोरा - किशोर पाटील
63. मालेगाव - दादा भुसे
64. सिन्नर - राजाभाऊ वाजे
65. निफाड - अनिल कदम
66. देवळाली - योगेश घोलप
67. खेड - आळंदी - सुरेश गोरे
68. पिंपरी चिंचवड - गौतम चाबुकस्वार
67. येवला - संभाजी पवार
70. नांदगाव - सुहास खांडे


संबंधित बातम्या