Vidhanparishad Election :  महाराष्ट्राच्या विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज संस्थांमधून निवडल्या जाणाऱ्या आमदारांच्या 17 जागांसाठी निवडणूक जाहीर झालेली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शेवटचे तीन दिवस राहिलेले आहेत. महायुतीमध्ये जागावाटपासंदर्भात चर्चा सुरु आहे. अशातच आता सोलापुरातून विधानपरिषद निवडणुकीसाठी पहिला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते, मोहोळचे माजी नगराध्यक्ष रमेश बारसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.  

Continues below advertisement

एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली उमेदवारी अर्ज भरल्याची माहिती

सोलापूरच्या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष आहे. मात्र असं असताना देखील शिवसेना शिंदे गटाचे नेते रमेश बारसकर यांनी आपला उमेदवारी अर्ज भरला आहे. निवडणूक ही लोकशाहीचा उत्साह आहे, त्यात भाग घेतल्याशिवाय शोभा येतं नाही असे बारस्कर म्हणाले. एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली हा अर्ज भरला आहे असं बारस्कर म्हणाले. राज्यात महायुतीचे सरकार आहे पण सोलापुरात जिल्ह्यात भाजपचे नेते शिवसेनेला सवतीची वागणूक देत असल्याचा आरोप रमेश बारसकर यांनी केला. कुठल्याही प्रकारचा निधी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिला जातं नाही, कुठल्याही समित्यावर शिवसेना कार्यकर्त्यांना संधी दिली गेली नाही. त्यामुळं निवडणुकीच्या माध्यमातून आपली ताकद आजमवाली पाहिजे म्हणून अर्ज भरल्याची माहिती रमेश बारस्कर यांनी दिली. पण अंतिम निर्णय हा एकनाथ शिंदे आणि श्रीकांत शिंदे जो घेतील तोच आदेश कायम असेल असे ते म्हणाले.

कालच उद्योगमंत्री उदय सामंत यांनी देखील महायुतीत मिठाचा खडा टाकण्याचे कामं करु नये, पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सर्वांना सोबत घेऊन चाललं पाहिजे असं वक्तव्य केलं होतं. यानंतर आज शिवसेनेकडून विधानपरिषदसाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे.  यानंतर भाजपची भूमिका नेमकी काय असेल? हे पाहावं लागणार आहे.  

Continues below advertisement

Vidhan Parishad Election 2026:  १७ जागांवर आधी कोण होते आमदार?

  1. सोलापूर : प्रशांत परिचारक (भाजप)
  2. अहिल्यानगर : अरुणकाका जगताप (राष्ट्रवादी)
  3. ठाणे : रवींद्र फाटक (शिवसेना)
  4. जळगाव : चंदूभाई पटेल (भाजप)
  5. सांगली-सातारा : मोहनराव कदम (काँग्रेस)
  6. नांदेड : अमर राजूरकर (काँग्रेस)
  7. यवतमाळ : दुष्यंत चतुर्वेदी (शिवसेना)
  8. पुणे : अनिल भोसले (राष्ट्रवादी)
  9. भंडारा-गोंदिया : परिणय फुके (भाजप)
  10. रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग : अनिकेत तटकरे (राष्ट्रवादी)
  11. नाशिक : नरेंद्र दराडे (शिवसेना)
  12. वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली : रामदास आंबटकर (भाजप)
  13. अमरावती : प्रवीण पोटे (भाजप)
  14. धाराशिव-लातूर-बीड : सुरेश धस (भाजप)
  15. परभणी-हिंगोली : विप्लव बाजोरिया (शिवसेना)
  16. छत्रपती संभाजीनगर-जालना : अंबादास दानवे (शिवसेना)
  17. नागपूर : चंद्रशेखर बावनकुळे (भाजप)