Vidhan Parishad Election Result :  विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठीच्या मतमोजणीतील पहिल्या टप्प्यातील निकाल जाहीर झाले असून त्यामध्ये भाजपचे (BJP) राम शिंदे, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, प्रवीण दरेकर यांचा विजय झाला आहे. 


चारही उमेदवारांनी मिळालेली मतं



  • राम शिंदे - 30

  • श्रीकांत - 30

  • दरेकर - 29

  • उमा खापरे - 27


त्यामुळे पहिल्यांदा या तिघांची दुसऱ्या मताची पसंती मोजली. पाचवे उमेदवार - प्रसाद लाड यांना - 17 मतं, त्यामुळे दुसऱ्या पसंतीच्या मतामुळे दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेरीत जिंकणार आहे. याचा अर्थ भाजपला 285 पैकी 133 मतं पडली. तिन्ही पक्षांची पहिल्या पसंतीची पुरेशी मतं त्यांना मिळाली नाहीत हा अर्थ आहे


काँग्रेसचे दोन्ही उमेदवार पहिल्या फेरीत कोटा पूर्ण करु शकले नाहीत.. त्यामुळे काँग्रेस 2 आणि प्रसाद लाड यांची मतमोजणी दुसऱ्या फेरीत होईल. याचा अर्थ तिन्ही पक्षांची पहिल्या पसंतीची मतं फुटली. भाजपला पहिल्या पसंतीची 133 मतं मिळाली. 


प्रसाद लाड दुसऱ्या फेरीत कसे जिंकतील? 


पहिल्या पसंतीची 133 मतं भाजपला मिळाली.  पहिल्यांदा राम शिंदे किंवा श्रीकांत भारतीय यांची पहिल्या पसंतीच्या मतांमुळे दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातील. मग प्रवीण दरेकरांच्या दुसऱ्या पसंतीची मतं मोजली जातील. शिवसेनेचे 02, राष्ट्रवादीचे 02, भाजपचे 04 पहिल्या फेरीत जिंकले, काँग्रेसला 01 उमेदवार पहिल्या फेरीत जिंकला असता पण तो जिंकवता आला नाही.


दरम्यान आपल्याला पराभूत करण्यासाठी भाजपने अनेक प्रयत्न केल्याचं सांगत एकनाथ खडसे भावूक झाले. विजयानंतर त्यांनी मदत केलेल्या सर्व आमदारांचे आभार मानले, तसेच भाजपकडून करण्यात आलेल्या गेल्या सहा वर्षाच्या छळाचा पाढाही वाचला. 


संबंधित बातम्या :