Maharashtra Assembly Elections 2024 : राज्यभरात लवकरच विधानसभेच्या निवडणुकांचं (Vidhan Sabha Elections 2024) बिगुल वाजणार आहे. लवकरच निवडणुका पार पडणार आहेत. निवडणुकांच्या वेळी मतदार हा अतिशय महत्त्वाचा घटक असतो. प्रत्येक नागरिकाला मतदानासाठी मतदान वोटर आयडी असणं गरजेचं आहे. पण, आपल्या देशात असेही अनेक लोक आहेत, ज्यांच्याकडे अद्याप मतदान वोटर आयडी नाही किंवा अनेकांचे मतदान आयडी गहाळ झालेले असतात. तर अशा वेळी करावं काय? जाणून घेऊया.


मतदार ओळखपत्राशिवाय देखील करता येईल मतदान


जर तुमचं मतदार ओळखपत्र हरवलं असेल तरी काळजी करण्याची गरज नाही. कारण मतदार ओळखपत्र नसतानाही तुम्ही यंदाच्या विधानसभा निवडणुकीत मतदान करू शकता. निवडणुकीत मतदान करण्यासाठी, प्रत्येक व्यक्तीकडे मतदार ओळखपत्र किंवा इलेक्ट्रॉनिक फोटो ओळखपत्र (EPIC) असणं आवश्यक आहे. भारतीय निवडणूक आयोगाच्या (ECI)नुसार, तुमचं मतदार ओळखपत्र हरवलं असेल तरीही तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता. मतदार ओळखपत्राशिवाय विधानसभा निवडणुकीत मतदान कसं करायचं ते जाणून घेऊया.


मतदार ओळखपत्र नसेल तर मतदान कसं करायचं?


जर तुमच्याकडे मतदार ओळखपत्र नसेल तरीही तुम्ही निवडणुकीत मतदान करू शकता. यासाठी फक्त एक महत्त्वाची गोष्ट करणं गरजेचं आहे. ओळखपत्र नसलं तरी चालेल, पण अधिकृत मतदार यादीत तुमचं नाव असलं पाहिजे. जर तुमचं यादीत नाव असेल तर तुम्ही घरी येणाऱ्या निवडणूक स्लिपची (Voter Slip) प्रिंटआउट घेऊन जाऊन मतदान करू शकता. फक्त या निवडणूक स्लिपसोबत तुम्ही खालील पैकी एक कागदपत्र मतदान केंद्रावर घेऊन जाऊ शकता:


1. पासपोर्ट


2. आधार कार्ड


3. पॅन कार्ड


4. ड्रायव्हिंग लायसन्स


5. मनरेगा कार्ड


6. केंद्र आणि राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांचं आयडी कार्ड


7. फोटो असलेलं पेन्शन कार्ड


हेही वाचा:


Vidhan Sabha Election 2024 : मतदार यादीत तुमचं नाव आहे की नाही हे कसं शोधायचं? चेक करा एका क्लिकवर