Up Election Result 2022 : उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल जवळपास निश्चित झाला आहे. पंजाब वगळता चार राज्यात भाजपने सत्ता स्थापनेचा दावा केला आहे. या निवडणुकीत काँग्रेसची दयनीय अवस्था झाली आहे. पंजाबमधील सत्ता तर गेलीच. शिवाय उत्तर प्रदेशमध्येही अपयश आले आहे. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसला दोन आकडी संख्याही गाठता आलेली नाही. प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये मुक्काम ठोकला होता, पण उत्तर प्रदेशमधील जनतेनं काँग्रेसला नाकारले आहे. 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची ही रंगीत तालीम होती. यामध्ये काँग्रेसला मोठं अपयश आले आहे. या विधानसभा निवडणुकीत राष्ट्रीय पक्ष काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली होती. निकालानंतर काँग्रेसचा स्पशेल अपयश आले आहे. 


उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक काँग्रेस पक्षाने प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वात लढली होती. काँग्रेसने सर्व 403 जागांवर आपले उमेदवार दिले होते. प्रचारादरम्यान प्रियंका गांधी यांनी 'लड़की हूं,लड़ सकती हूं' या घोषणासह महिलांना 40 टक्के जागा दिल्या होत्या. पण काँग्रेसला 2017 विधानसभा निवडणुकीपेक्षा दारुण पराभव झाला आहे. काँग्रेस पक्षाला 403 जागांपैकी फक्त दोन जागांवर समाधान मानावे लागले आहे. या निकालावरुन उत्तर प्रदेशमधील जनतेने प्रियंका गांधी यांचे नेतृत्व नाकारल्याचे स्पष्ट दिसतेय. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीद्वारे प्रियंका गांधी यांनी राष्ट्रीय राजकारणात प्रवेश केला. पण प्रियंका गांधी यांची एन्ट्री सुपरफ्लॉप ठरल्याचे दिसतंय. 


2019 मध्ये प्रियंका गांधी यांनी राष्ट्रीय महासचिव म्हणून प्रत्यक्ष राजकीय कारकीर्दिला सुरुवात केली होती. त्यावेळी काँग्रेसच्या बुडत्या जहाजाला प्रियंका गांधी सावरतील, असं सर्वांना वाटले होते. पण यंदाच्या निवडणूक निकालानंतर काँग्रेसच्या अपेक्षांवर पाणी फेरल्याचेच दिसतंय. जवळपास दोन दशकांपासून काँग्रेसने प्रियंका गांधी नावाचा डाव सांभाळून ठेवला होता. यंदाच्या निवडणुकीत त्यांना हा डाव खेळला, पण त्यांचा हा डावही अपयशी ठरला आहे.  


प्रिंयका गांधी यांनी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीवर आपले सर्वस्वी लक्ष केंद्रीत केले होते. उत्तर प्रदेशमधील जनतेसाठी 'लड़की हूं, लड़ सकती हूं' हा नारा देत राजकारणात प्रवेश केला.  प्रियंका गांधी यांनी उत्तर प्रदेशमध्ये 209 रॅली आणि रोड शो केले होते. अशोक गहलोत, भूपेश बघेल, सचिन पायलट यांच्यासह अनेक दिग्गजांनी उत्तर प्रदेशमध्ये प्रचार केला. यावेळी लखीमपुर हिंसा, हाथरस प्रकरण, रोजगार आणि महिला सुरक्षा यासारख्या वेगवेगळ्या मुद्यांवरुन प्रियंका गांधी यांनी योगी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता. पण यामध्ये प्रियंका गांधी यांना अपयश आले आहे. पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर काँग्रेसचा पाय आणखी खोलात गेल्याचं चित्र दिसतंय. 


गेल्या काही वर्षांपासून उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची कामगिरी खालावल्याचे दिसत आहे. राष्ट्रीय पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षाला 1985 मध्ये बहुमत मिळाले होते. तेव्हापासून आजतागत काँग्रेस पक्षाचा जागा कमी झाल्याचे दिसत आहे. पाहा उत्तर प्रदेशमधील कांग्रेसची कामगिरी...




संबंधित बातम्या: