up election 2022: देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकींचा रणसंग्राम सुरू आहे. या रणसंग्रामातील मतदानाचा पहिला टप्पा आज पार पडत आहे. उत्तर प्रदेशमधील 58 विधानसभेच्या जागांसाठी आज मतदान होत आहे. या मतदानाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी मतदारांना आवाहन करणारे एक ट्वीट केले आहे. 'देशाला भयमुक्त करा, बाहेर या मतदान करा' असे आवाहन करणारे ट्वीट राहुल गांधी यांनी केले आहे. सर्व मतदारांना मतदारांनी मतदानाचा हक्क बजावण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
 
उत्तर प्रदेशमध्ये आज पहिल्या टप्प्यातील मतदान  प्रक्रिया पार पडत आहे. पहिल्या टप्प्यातील मतदानाची तयारी पूर्ण झाली आहे. 11 जिल्ह्यांतील 58 विधानसभा जागांसाठी मतदान होत आहे. या टप्प्यात पश्चिम उत्तर प्रदेशातील बहुतांश जागांवर मतदान होणार आहे. मतदानापूर्वी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही ट्वीट करुन सर्व मतदारांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करुन मतदान करण्याचे आवाहन केले आहे. तसेच लोकशाहीच्या या पवित्र उत्सवात सर्वांनी उत्सहाने सहभागी व्हावे असेही ते म्हणालेत. लक्षात ठेवा आधी मतदान करा मग अल्पोपहार घ्या असेही ते म्हणालेत.


दरम्यान, उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी मतदान होणार आहे. ही मतदान प्रक्रिया 7 टप्प्यात पार पडणार आहे. याातील पहिला टप्पा आज पार पडणार आहे. आज 58 जागांसाठी मतदान होणार आहे. मतदानाला सकाळी 7 वाजल्यापासू सुरू होणार असून सायंकाळी 6 वाजेपर्यंत मतदान होणार आहे. या भागात शेतकरी व जाट यांचे प्राबल्य आहे, त्यामुळे यावेळी शेतकरी आंदोलनामुळे येथील समीकरण गेल्या निवडणुकीपेक्षा काहीसे वेगळे मानले जात आहे. 2017 च्या विधानसभा निवडणुकीचा विचार केला तर या भागातील भाजपने 58 पैकी 53 जागा जिंकून भाजपने मोठी आघाडी घेतली होती. मात्र यावेळी ते तितकेसे सोपे मानले जात नाही.


महत्त्वाच्या बातम्या: