UP Election 2022: उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपानं पहिल्या टप्प्यातील 58 पैकी 53 उमेदवारांची यादी जाहीर केलीय. लखनऊ येथे पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आपल्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केलीय. त्यावेळी विविध मुद्द्यावर भाष्य केलं. "इतर पक्ष युती करून बसपाला सत्तेत येण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु, मला खात्री आहे की जनता आम्हालाच पुन्हा सत्तेत आणेल. यावेळीही सत्तेत आल्यानंतर आम्ही जनतेच्या हितासाठीच काम करू", असं पक्षाच्या अध्यक्ष मायावती यांनी म्हटलंय.
मायवती यांनी त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्त लखनऊमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी यूपी निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील उमेदवारांची नावे जाहीर केली. "आम्ही विधानसभेच्या 58 जागांपैकी 53 जागांवर आमच्या उमेदवारांची नावे निश्चित केली आहेत आणि उर्वरित 5 जागांवरही एक-दोन दिवसांत उमेदवारांची नावे निश्चित केली जातील", असं त्यांनी म्हटलंय.
बसपा पुन्हा सत्तेत येईल
"आगामी विधानसभा निवडणुकीत जनता नक्कीच आमच्या पक्षाला पुन्हा सत्तेत आणेल. यावेळीही सत्तेत आल्यानंतर आम्ही जनतेच्या हितासाठीच काम करू", असा विश्वास मायावती यांनी व्यक्त केलाय.
जनतेनं विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नये
जनतेनं विरोधकांच्या भुलथापांना बळी पडू नये. जातीवादी आणि बसपा विरोधी पक्षांपासून दूर राहा. मी लोकसभेत चार वेळा, राज्यसभेत तीनदा, विधानसभेत दोनदा आणि दोनदा आमदार झाले. कांशीराम यांच्यानंतर पक्षाची जबाबदारी माझ्यावर आहे. त्यामुळं मी निवडणूक लढवणार नाही. सरकार स्थापन झाल्यास मी विधान परिषदेच्या माध्यमातून सरकारचे नेतृत्व करेल, असंही मायावती यांनी म्हटलंय.
तसेच “2022 हे वर्ष आशेचं वर्ष आहे, बदल घडेल. माझ्या लिखित 'मेरे संघर्ष मेरे स्मरण' या पुस्तकाचे प्रकाशन होत आहे. तरुण पिढीसाठी हे प्रेरणादायी ठरेल. बसपाचे आंबेडकरवादी धोरण असे सुरु राहील, असंही आश्वासन मायावती यांनी दिलंय.
हे देखील वाचा-
- Coronavirus Cases : गेल्या 24 तासात देशात 2 लाख 68 हजार 833 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर 402 जणांचा मृत्यू
- संयुक्त किसान मोर्चाची सिंघू बॉर्डरवर आज बैठक, 26 जानेवारीला ट्रॅक्टर मोर्चा निघणार?
- India China Trade : सीमेवर तणाव असतानाही भारत-चीनमधील व्यापार विक्रमी, 2021मध्ये 125 अब्ज डॉलरचा व्यापार
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha