Uddhav Thackeray : विधानसभेच्या निवडणुकीवेळी शिवाजी पार्कवर त्यांच्या खुर्च्या रिकाम्या होत्या. आत्ता सुद्धा आमच्या सभेला शिवाजी पार्क फुलून गेलं होतं, पण त्यांच्या सभेला गर्दी नव्हती. मग आमच्या सभेला गर्दी होते पण मतं मिळत नाहीत, मग त्यांना रिकाम्या खुर्च्यांनी मतदान केलं का? असा सवाल करत उद्धव ठाकरेंनीविरोधकांवर टीका केली. महापालिका निवडणुकीच्या निकालानंतर प्रथमच उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजपसह शिवसेना शिंदे गटावर जोरदार टीका केली. शिवसेना संपवण्याचा त्यांनी पूर्ण प्रयत्न केला. अर्धे आमचे नगरसेवक त्यांनी गळाला लावले, आत्ता ते गाळात गेल्याचे ठाकरे म्हणाले. भाजप पक्ष हा कागदावर आहे पण जमिनीवरती नाही असा टोला देखील उद्धव ठाकरेंनी लगावला.  

Continues below advertisement

मुंबईमध्ये आमचा महापौर व्हावा ही इच्छा

29 महापलिका निवडणुकांचा निकाल जाहीर झाला आहे. सर्व महापालिकांमध्ये प्राचारला जाऊ शकलो नाही. चंद्रपूरमध्ये शिवसेनेचे नगरसेवक जिंकून आले, परभणीमध्ये चांगलं यश मिळाल्याचे ठाकरे म्हणाले. शिवशक्तीला ज्यांनी ज्यांनी मतदान केलं त्यांचे आभार मानतो. अत्यंत घाणेरड्या पद्धतीने ही निवडूक झाली आहे. साम दाम दंड भेद विसरुन त्यांनी ही निवडणूक लढवल्याचे मत उद्धव ठाकरेंनी व्य्क्त केले.  मुंबईमध्ये आमचा महापौर व्हावा ही इच्छा होती आजही आहे. आम्ही आकडा गाठू शकलो नाही. पण आमच्या यशाने घाम फोडल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले.  मुंबई सोडून मी बाहेर जाऊ शकलो नाही त्यांची दिलगिरी व्यक्त मी केली आहे.  पुन्हा सत्ता येईल जशी झाडांची पाने गळून पुन्हा नवी पालवी येते तशी नवी पालवी येईल आणि सत्ता येईल असे ठाकरे म्हणाले. मतदान झाल्यावर एक्सिट पोल जाहीर झाले. कसे झाले. मतदान सुरु होण्यापूर्वी निकाल लागत होते. बॅलेट पेपर पण नव्हते असे ठाकरे म्हणाले. 

आम्ही कमजोर नाही. आम्ही रस्त्यावर आहोत 

आम्ही कमजोर नाही. आम्ही रस्त्यावर आहोत असेही उद्धव ठाकरे म्हणाले. अडीच वर्ष अडीच वर्ष महापौर ते म्हणताय. आत्ता त्यांचा पक्ष फोडून महापौर बसवणार का? जसा आमचा पक्ष फोडला तसा पक्ष फोडतील. इंटरेस्टिंग आहे कीं महापौर कोणाचा होईल असे ठाकरे म्हणाले. मुंबई सोडून मी बाहेर जाऊ शकलो नाही त्यांची दिलगिरी व्यक्त मी केली आहे.  पुन्हा सत्ता येईल जशी झाडांची पाने गळून पुन्हा नवी पालवी येते तशी नवी पालवी येईल आणि सत्ता येईल असे ठाकरे म्हणाले. मतदान झाल्यावर एक्सिट पोल जाहीर झाले. कसे झाले. मतदान सुरु होण्यापूर्वी निकाल लागत होते. बॅलेट पेपर पण नव्हते असे ठाकरे म्हणाले. 

Continues below advertisement