Lok Sabha Elections 2024 : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रत्येक मतदारसंघाची चाचपणी केली जात आहे. बारमती, कोल्हापूर, शिरुरनंतर आता अकोला आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला. या बैठकीमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे समजतेय. शिंदेंसोबत गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव करा, असा आदेशही ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिलाय.


खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव करा 


शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतला. माझ्यासोबत राहिल्या निष्ठावंतांनी आपला बालेकिल्ला शाबूत ठेवा ! असा आदेश उद्धव ठाकरेंनी बैठकीत पदाधिकाऱ्यांना दिल्याचे समजतेय. इंडिया आघाडीमध्ये बुलढाणा लोकसभा मतदार संघ हा आपला पक्ष लढवणार आहे. शिंदेंसोबत गेलेल्या खासदार प्रतापराव जाधव यांचा पराभव करा आणि या बालेकिल्ला असलेल्या मतदारसंघात आपलाच उमेदवार निवडून आणा, असाही आदेश ठाकरेंकडून आपल्या पदाधिकाऱ्यांना दिलाय. बुलढाणा लोकसभा मतदारसंघात आपली ताकद आणखी वाढवून विधानसभा मतदारसंघात सुद्धा जिथे भाजपचा उमेदवार उभा राहील, त्याचा पराभव करण्याची रणनीती आतापासूनच आखा आणि तयारीला लागा, अशी सूचना उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिली. ट


अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीत काय झाले ?


ठाकरे गटाची लोकसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडी सोबत युती राहिल्यास अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडीला जाणार का? असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून अकोलाकरांना सतवतोय. अकोला लोकसभा मतदारसंघात भाजप विरोधात लढण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची ताकद किती महत्त्वाची ? याचा उद्धव ठाकरेंनी स्थानिक नेत्यांकडून पदाधिकारी यांच्याकडून आढावा घेतला. अकोला लोकसभा मतदारसंघात वंचित बहुजन आघाडीसोबत युती किती फायद्याची ? याबाबत पदाधिकाऱ्यांना उद्धव ठाकरेंनी विचारणा केली. भाजपने आपल्या सोबत गद्दारी केलीये, त्यामुळे विधानसभा असू द्या किंवा मग लोकसभा ! भाजपाचा पराभव करण्यासाठी तयारीला लागा, असे आदेश उद्धव ठाकरेंनी पदाधिकाऱ्यांना दिले आहेत. 


अमरावती लोकसभा मतदारसंघाचा उद्धव ठाकरे यांनी घेतला आढावा -


अमरावती लोकसभा मतदारसंघात पुन्हा एकदा आपला खासदार तुम्ही मला निवडून आणून द्यायचा आहे. या मतदारसंघात आपली ताकद आहे पाठिंबा आहे मात्र ही ताकद आणखी वाढवण्यासाठी तयारी सुरू ठेवा, असे उद्धव ठाकरे यांनी अमरावती लोकसभा मतदारसंघाचा आढावा बैठकीत पदाधिकाऱ्यांना सांगितले. 


इंडिया आघाडीमध्ये सुद्धा या लोकसभा मतदारसंघांमध्ये आपला पक्षाचा उमेदवार या लोकसभा मतदारसंघाच्या जागेसाठी उभा राहील आणि तो निवडून येईल असा विश्वास आहे. उमेदवारी या लोकसभा मतदारसंघातून कोणाला द्यायची त्याचा निर्णय लवकरच योग्य वेळी घेऊ, असे ठाकरे यावेळी म्हणाले.


नितीन देशमुख काय म्हणाले ?


अकोला लोकसभा मतदारसंघाचा आढावा उद्धव ठाकरे यांनी घेतली. जर भाजपला अकोला लोकसभा मतदारसंघामध्ये थांबवायचे असेल तर शिवसेना ठाकरे गटाने ही जागा लढावावी. ही जागा महाविकास आघाडी म्हणून लढवताना जर वंचित यामध्ये असेल तर वंचित बहुजन आघाडीला गेली किंवा काँग्रेसला गेली तर आदेश मिळाल्यानंतर आम्ही ताकद देऊ, असे नितीन देशमुख म्हणाले. 


अकोला लोकसभा मतदारसंघाची जागा काँग्रेसने लढवू नये. ही आमची इच्छा आम्ही उद्धव ठाकरे यांना बोलवून दाखवली आहे. वंचित बहुजन आघाडी जर लोकसभेला आमच्यासोबत असेल तर त्यांची ती युती विधानसभेला सुद्धा सोबत असायला हवी. महाविकास आघाडीमध्ये आणि इंडिया आघाडीमध्ये सर्व नेत्यांनी चर्चा करून ज्या पक्षाच्या उमेदवाराला ती जागा देईल त्या उमेदवाराला ताकद शिवसेना ठाकरे गट देईल, असे देशमुख म्हणाले.