Uday Samant Profile : यंदाही रत्नागिरी मतदारसंघावर उदय सामंतांचा बोलबाला आहे, त्यांनी ठाकरे गटाच्या उमेदवाराचा दारुण पराभव केला आहे. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघावर पुन्हा एकदा उदय सामंत (Uday Samant) निवडून आले आहेत. शिवसेना शिंदे गटाने रत्नागिरीचा गड राखला आहे. तर शिवसेना ठाकरे गटाच्या बाळ माने यांचा रत्नागिरीत पराभव झाला आहे. उदय रवींद्र सामंत यांनी 2014 च्या विधानसभा निवडणुकीतही विजय मिळवला आहे. त्यांनी तब्बल 1 लाख 18 हजार 484 मतांनी विजय मिळवला आहे. 41 हजार 590 मतांच्या फरकाने त्यांनी निवडणूक जिंकली.


कोण आहेत उदय सामंत?


नव्वदच्या दशकात उदय सामंत यांनी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून राजकारणात सुरुवात केली.


2004 मध्ये उदय सामंत यांनी पहिल्यांदा विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला. यावेळी त्यांनी भाजपचे खालील आमदार सुरेंद्र उर्फ बाळ माने यांचा पराभव केला.


2004 ते 2024 असं सलग पाचवेळा उदय सामंत विधानसभा निवडणुकीत विजयी.


2013 मध्ये उदय सामंत राज्यमंत्री होते. ( नगर विकास, वने, बंदरे, खार जमीन, क्रीडा व युवक कल्याण, माजी सैनिक कल्याण, विधी व न्याय, मत्स्य व्यवसाय व मराठी भाषा )


2013 - पालकमंत्री, रत्नागिरी जिल्हा 


2016 - अध्यक्ष, अंदाज समिती महाराष्ट्र विधानमंडळ 


31 ऑगस्ट 2018 - अध्यक्ष, म्हाडा (महाराष्ट्र)


30 डिसेंबर 2019 - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री 


8 जानेवारी 2020 - पालकमंत्री, सिंधुदुर्ग 


9 ऑगस्ट 2022 - उद्योग मंत्री 


28 सप्टेंबर 2022 - पालकमंत्री, रत्नागिरी व रायगड जिल्हा 


विश्वस्त  - अखिल भारतीय नाट्य परिषद, मुंबई 


अध्यक्ष - रत्नागिरी जिल्हा नाट्य परिषद 


माजी अध्यक्ष - रत्नागिरी जिल्हा क्रिकेट असोसिएशन


रत्नागिरी मतदारसंघाचा इतिहास


शिदेंच्या शिवसेनेचे उदय सामंत या ठिकाणचे विद्यमान आमदार. 2004 मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर आत्तापर्यंत कामगिरी सरस ठेवण्यात सामंतांना यश मिळालं आहे. 2004 , 2009 च्या दोन्ही निवडणुका सामंत यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढवल्या. पण, 2014 च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सामंत यांनी धनुष्यबाण हाती घेतला. मुख्यबाब म्हणजे बंडानंतर ठाकरेंसोबत कायम असण्याची भाषा करणारे सामंत ऐनवेळी शिंदेंसोबत गेले. 2019 मध्ये उदय सामंता यांनी शिवसेनेकडून लढताना 1 लाख 58 हजार 514 मतांपैकी 1 लाख 18 हजार 484 म्हणजेच 74.8 टक्के मतं घेतली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुदेश मयेकर यांचा पराभव केला. मयेकर यांना 19.7 टक्के म्हणजे 31,146 मतं मिळाली. 2019 मध्ये रत्नागिरी - संगमेश्वर या विधानसभा मतदारसंघात 1 लाख 58 हजार 514 जणांनी मतदान केलं होतं. 


हेही वाचा:


Ratnagiri District Vidhan Sabha Election 2024 Result : रत्नागिरीत 3 जागांवर शिंदेंचा आमदार, अजितदादांचाही उमेदवार जिंकला; कोकणचा राजा कोण?