शरद पवारांची अवस्था 'शोले'तील जेलरसारखी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शरद पवारांचे निकटवर्तीय दिलीप सोपल यांनी राष्ट्रवादीला रामराम करुन शिवबंधन हाती बांधलं. आता ते शिवसेनेकडून निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघात राष्ट्रवादीकडून निरंजन भूमकर मैदानात आहेत.
काही दिवसांपूर्वी विरोधकांवर शरसंधान साधताना मुख्यमंत्र्यांनी इथे विरोधक नसल्याचं म्हटलं होतं. याविषयी शरद पवारांनी बार्शीतल्या सभेत भाष्य केलं. शरद पवार म्हणाले की, "मुख्यमंत्री, ठाकरे म्हणतात, इथे लढाईच नाही. कुस्तीला कोणीला समोर नाही. पण कुस्ती पैलवानांची होते अशांची (हात वारे करुन) होत नाही.
तसंच दिलीप सोपलांवर टीका करताना पवार म्हणाले की, "सोपलांनी विकास करायचा आहे असं सांगून पक्ष सोडला, मग इतकी वर्षे काय केलं? (हातवारे करुन)