हैदराबाद : तेलंगणात काँग्रेसच्या वादळात भल्याभल्या उमेदवारांची बोलती बंद झाली, काँग्रेसचा सर्वत्र बोलबाला होतोय. पण काँग्रेसचे उमेदवार मोहम्मद अझरुद्दीनला (Mohammed Azharuddin) मात्र पराभवाचा धक्का बसला आहे. तेलंगणातील ज्युबली हिल्स मतदारसंघातून काँग्रेसचे मोहम्मद अझरुद्दीन यांचा पराभव झाला आहे. मतमोजणीच्या 26 फेऱ्यांनंतर अझरुद्दीन यांना एकूण 62,343 मते मिळाली. अझरुद्दीन यांचा बीआरएस उमेदवार मगंथी गोपीनाथ यांनी पराभव केला आहे. गोपीनाथ यांनी अझरुद्दीन यांचा 15,939 मतांनी पराभव केला. गोपीनाथ यांना 26 व्या फेरीपर्यंत 78,282 मते मिळाली आहेत. भाजपच्या लंकाला दीपक रेड्डी 25,083 मतांसह तिसऱ्या स्थानावर आहेत. ज्युबली हिल्समध्ये फक्त 26 फेऱ्या मोजायच्या होत्या.


तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये विधानसभेच्या एकूण 15 जागा आहेत. यापैकी एक जागा ज्युबली हिल्स होती. बीआरएसच्या मागंती गोपीनाथ यांनी 2018 मध्येही ही जागा जिंकली होती. त्यांचा हा सलग दुसरा विजय आहे. मोहम्मद अझरुद्दीन यांनी निवडणूक लढवली तेव्हा ज्युबली हिल्स ही हायप्रोफाईल जागा बनली. या जागेवर चुरशीची लढत होणार असल्याची चर्चा होती. पण तेलंगणात काँग्रेसचा दणदणीत विजय होऊनही अझरुद्दीन जुबली हिल्स मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत.


2018 सालची लोकसभा जिंकली होती


अझरुद्दीनने 2009 मध्ये यूपीच्या मुरादाबादमधून लोकसभा निवडणूक जिंकली होती. मोहम्मद अझरुद्दीन यांनी 2009 मध्ये उत्तर प्रदेशातील मुरादाबाद मतदारसंघातून काँग्रेसकडून निवडणूक लढवली होती. अझरुद्दीन या निवडणुकीतही विजयी झाला. लोकसभा निवडणुकीत त्यांनी भाजपच्या कुंवर सर्वेश कुमार सिंह यांचा पराभव केला. त्यानंतर 2014 मध्ये त्यांनी राजस्थानच्या टोंक-सवाई माधोपूरमधून निवडणूक लढवली. मात्र यावेळी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. अझरुद्दीन यांचा भाजपच्या सुखबीर सिंग जौनपुरिया यांनी पराभव केला. अझरुद्दीन तेलंगणात पहिल्यांदाच निवडणूक लढवत होता.


तेलंगणामध्ये काँग्रेसची जादू


गेल्या 10 वर्षांपासून सत्तेत असलेल्या बीआरएसचा पराभव करत काँग्रेसने पुन्हा एकदा सत्ता प्राप्त केली आहे. केसीआर यांच्या पक्षाला 39 जागांवर समाधान मानावं लागलं तर काँग्रेसने या ठिकाणी 64 जागा पटकावल्या आहेत. 


तेलंगणा - एकूण जागा 119



  • काँग्रेस - 64

  • बीआरएस - 39

  • भाजप - 08

  • एमआयएम - 08


मिनी लोकसभा असं समजल्या जाणाऱ्या या निवडणुकीत भाजपने जोरदार मुसंडी मारल्याचं स्पष्ट झालंय. अनेक एक्झिट पोलमध्ये काँग्रेस तीन राज्यांमध्ये सत्ता मिळवेल अशी शक्यता वर्तवण्यात आली होती. ती आता खोटी ठरली असून भाजपने मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये विजय प्राप्त केला. तर तेलंगणामध्ये काँग्रेसने सत्ता मिळवली. 


ही बातमी वाचा: