Rajasthan Assembly Election Results 2023: राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत (Ashok Gehlot) यांनी सरदारपुरा मतदारसंघातून 26,396 मतांनी विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाच्या वेबसाइटनुसार, गेहलोत यांना एकूण 96,859 मते मिळाली. त्यांनी भाजपचे महेंद्र राठोड यांचा पराभव केला आहे, ज्यांना 70,463 मते मिळाली आहेत. सरदारपुरा मतदारसंघातून (Sardarpura constituency) गेहलोत सलग सहाव्यांदा विजयी झाले आहेत.
अशोक गेहलोत सरदारपुरा येथून विजयी
राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव झाला (Rajasthan Election Result 2023) आहे, मात्र अशोक गेहलोत आपली जागा वाचवण्यात यशस्वी झाले आहेत. पुन्हा एकदा ते सरदारपुरामधून विजयी झाले आहेत. गेहलोत यांनी भाजपचे महेंद्र राठोड यांचा 26,396 मतांनी पराभव केला आहे. अशोक गेहलोत सलग सहा वेळा या मतदारसंघातून निवडून आले आहेत.
सदरपुरा मतदारसंघातून मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांना एकूण 56.67 टक्के मते मिळाली. तर विरोधी भाजपचे उमेदवार डॉ. महेंद्रसिंह राठोड यांना 41.13 टक्के मते मिळाली. 1998 मध्ये सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातून पोटनिवडणूक जिंकून मुख्यमंत्री अशोक गेहलोत पहिल्यांदा विधानसभेत पोहोचले आणि पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री बनले. यानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी येथून सलग पाच विधानसभा निवडणुका जिंकल्या. सरदारपुरा विधानसभा मतदारसंघातून 1998, 2003, 2008, 2013, 2018 आणि आता 2023 मध्येही त्यांनी विधानसभा निवडणूक जिंकली.
या काळात अशोक गेहलोत 1998-2003, 2008-2013 आणि 2018 ते 2023 या काळात राजस्थानचे मुख्यमंत्री होते. सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपद भूषवणाऱ्या लोकांच्या यादीत अशोक गेहलोत दुसऱ्या क्रमांकावर आहेत, पहिल्या क्रमांकावर मोहन लाल सुखाडिया आहेत, ते 16 वर्षे 194 दिवस राजस्थानचे मुख्यमंत्री होते. अशोक गेहलोत हे 14 वर्षे 353 दिवस राजस्थानचे मुख्यमंत्री राहिले आहेत.
मुख्यमंत्री गेहलोत यांनी राजीनामा दिला
राजस्थानमध्ये भाजपच्या दणदणीत विजयानंतर मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. सीएम गेहलोत रविवारी (3 डिसेंबर) संध्याकाळी राजभवनात पोहोचले आणि त्यांनी राज्याचे राज्यपाल कलराज मिश्रा यांच्याकडे राजीनामा पत्र सुपूर्द केले. राज्यपाल मिश्रा यांनी तात्काळ हा राजीनामा स्वीकारला आणि राज्यात नवीन सरकार स्थापन होईपर्यंत काम करत राहण्याचे आवाहन केले.
राजस्थानमध्ये भाजपने 115 जागा जिंकल्या आहेत, तर काँग्रेस केवळ काही जागांवर मर्यादित आहे. तर भारतीय आदिवासी पक्षाने तीन, बहुजन समाज पक्षाने दोन, राष्ट्रीय लोकदल एक आणि राष्ट्रीय लोक तांत्रिक पक्षाने एक जागा जिंकली आहे. याशिवाय 8 जागांवर अपक्ष उमेदवार विजयी झाले आहेत. काँग्रेस उमेदवाराच्या निधनानंतर एका जागेवरील निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. निवडणूक आयोगाच्या घोषणेनंतर या जागेवर निवडणूक होणार आहे.
ही बातमी वाचा: