Sushma Andhare on Keshav Upadhye: महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपकडून निवडणुकीपूर्वीच अनेकांना पायघड्या घालत अक्षरशः रेड कार्पेट अंथरून पक्षप्रवेश करुन घेण्यात आले. निष्ठावंताना डावलून अनेक ठिकाणी भाजपने आयाराम उमेदवारांनाच पसंती दिल्याने निष्ठावतांना मात्र पुन्हा एकदा सतरंज्या उचलण्याची वेळ आली आहे. त्यामुळे निष्ठावंतांच्या नाराजीचा स्फोट चांदा ते बांदापर्यंत झाला आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता सातत्याने ठाकरे यांच्या विरोधात टीकाटिप्पणी करणाऱ्या भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांना शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी खोचक शब्दांमध्ये टोला लगावला आहे. 

Continues below advertisement

सुषमा अंधारेंची केश उपाध्ये यांच्यावर खोचक टिप्पणी

सुषमा अंधारे उपाध्ये यांच्यावर अत्यंत खोचक टिप्पणी केली आहे. त्यांनी ट्विट करत म्हटलं आहे की मला आज सगळ्यात जास्त वाईट वाटतं ते तुमच्याबद्दल... एवढ्या एकाच वाक्यामध्ये केशव उपाध्ये यांची पक्षांमध्ये होत असलेली कुचंबणा अधोरेखित करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. दुसरीकडे अलीकडेच भाजपच्या माध्यम प्रमुखपदाची संधी भेटलेल्या नवनाथ बन यांना सुद्धा भाजपकडून मुंबईमध्ये उमेदवारी देण्यात आल्याने केशव उपाध्ये यांना हा सुषमा अंधारे यांनी टोला लगावल्याचे बोलले जात आहे. मुंबईत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या घरातील तिघांना उमेदवारी भाजपकडून देण्यात आली आहे. भाजपकडून विधान परिषदेचे आमदार प्रविण दरेकर यांचे भाऊ प्रकाश दरेकर यांनाही उमेदवारी देण्यात आली आहे. दहिसरमध्ये वॉर्ड क्रमांक तीनमधून उमेदवारी देण्यात आली आहे.

भाजपचे 9 तरुण प्रवक्ते रिंगणात!

दुसरीकडे, भाजपच्या 9 प्रवक्त्यांना उमेदवारी मिळाल्याचे केशव उपाध्ये यांनी फेसबुक पोस्ट करत माहिती दिली आहे. त्यांनी भारतीय जनता पार्टीने येत्या महापालिका निवडणुकांसाठी तरुणाईवर ठाम विश्वास टाकत 9 युवा प्रवक्त्यांना उमेदवारी दिली असल्याचे म्हटलं आहे. मुंबईतून नवनाथ बन, गणेश खंडकप, राणी द्विवेदी, नील सोमय्या, योगेश वर्मा,  मकरंद नार्वेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ठाण्यातून मृणाल पेंडसे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. पुण्यातून कुणाल टिळक, नागपूरातून शिवानी दाणी यांना उमेदवारी मिळाली आहे.  हे सर्व उत्साही, अभ्यासू आणि जमिनीवर काम करण्याची तयारी असलेले आहेत. आपल्या-आपल्या वॉर्डमध्ये ठोस, पारदर्शक आणि लोकाभिमुख काम करून दाखवण्याची क्षमता या सर्वांमध्ये आहे. या 9 तरुण प्रवक्त्यांना मनःपूर्वक शुभेच्छा! तरुणाईच्या बळावर, विकासाच्या दिशेने एक पाऊल पुढे, असे केशव उपाध्ये यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे. 

इतर महत्वाच्या बातम्या