BMC Election Candidates List: प्रचंड ओढाताण, गोंधळ आणि टोकाच्या नाराजीनाट्यानंत अखेर जवळ जवळ सर्वच राजकीय पक्षानी आपले उमेदवार निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. मात्र दुसरीकडे बंडखोरीचा संभाव्य धोका टाळण्यासाठी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत राजकीय मंडळी नावं जाहीर करताना सावधगिरी बाळगताना दिसत असल्याचे चित्र आहे. अशातच आता मुंबई महानगर पालिका निवडणुकांसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आपल्या उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे. मुंबई महानगरपालिका निवडणूक 2025 साठी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे या ठाकरे बंधूनी युती (Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance) जाहीर केली आहे. तर दुसरीकडे आता तिसरा भिडू म्हणून शरद पवारांच्या राष्ट्रवादीनेही यात उडी घेत हि लढत अधिक चुरशीची केली आहे. मात्र आता पडद्यामागे नेमकं काय घडामोड घडते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Continues below advertisement

मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने पहिल्या यादीत 7 तर दुसऱ्या यादीत 4 अशा एकूण 11 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात कुणाच्या नावांचा समावेश आहे, हे जाणून घेऊ. (BMC Election 2026)

राष्ट्रवादीच्या मुंबईमधील उमेदवारांची यादी- (NCP Sharad Pawar Candidate List BMC Election 2026)

Continues below advertisement

1. वॉर्ड क्रमांक 43 – अजित रावराणे

2. वॉर्ड क्रमांक 140 – संजय कांबळे

3. वॉर्ड क्रमांक 78 – रदबा गेऊलकर

4. वॉर्ड क्रमांक 48 – गणेश शिंदे

5. वॉर्ड क्रमांक 170 – राही खानोलकर

6. वॉर्ड क्रमांक 51 – आरती चव्हाण

7. वॉर्ड क्रमांक 112 – मंजू जयस्वाल

8. वॉर्ड क्रमांक 224 – सानिया शाह

9. वॉर्ड क्रमांक 165 - अभिजित कांबळे

10. वॉर्ड क्रमांक 107 – भरत वनानी

11. वॉर्ड क्रमांक 211 – सुफियान अन्सारी

Raj Thackeray-Uddhav Thackeray Alliance : ठाकरे बंधूंची भाजपा-शिंदे गटाला कडवी टक्कर!

राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र मुंबई महानगपालिकेची निवडणुक लढवणार आहे. मुंबई महानगरपालिकेत 227 साठी मतदान होणार आहे. यामध्ये मनसेला 52 जागा निश्चित झाल्या आहेत. तर आतापर्यत 135 एबी फॉर्म ठाकरे शिवसेना गटाने दिले आहेत. अजूनही एबी फॉर्म दिले जात आहेत. ठाकरे शिवसेना 160 ते 165 एबी फॉर्म देणार असल्याचा कळतंय. तर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षासाठी 10 ते 12 जागा सोडणार आहे. दरम्यान, मुंबईसह राज्यातील एकूण महापालिकांमध्ये 15 जानेवारी 2026 ला मतदान होणार आहे. तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल.