Suresh Dhas, बीड : बीडच्या आष्टी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार बाळासाहेब आजबे आणि भाजपाचे उमेदवार सुरेश धस यांच्यात मैत्रीपूर्ण लढत आहे. मात्र ही लढत केवळ नावापुरतीच असल्याचे आज दिसून आले. कारण सुरेश धसांच्या प्रचारासाठी भाजप नेत्या पंकजा मुंडे मैदानात उतरल्या आहेत. या दरम्यान सुरेश धस यांनी बाळासाहेब आजबे आणि भाजपाचे बंडखोर उमेदवार भीमराव धोंडे यांच्यावर बोचरी टीका केलीय. 


ज्या चाली मतदार संघात खेळल्या जात आहे. त्या चालींवर आपण स्वार होऊ काही जण पैशांची भाषा बोलत आहेत. मात्र  आता काही उपयोग होणार नाही असं थेट आव्हान धस यांनी विरोधकांना दिले आहे. फक्त सुरेश धस नको असे वाटणारे काही लोक बीड जिल्ह्यात आहेत. त्यांनी कल्पित केले आहे. परंतु हे साध्य होणार नाही. तर आतापर्यंत आष्टी मतदारसंघात फेक नरेटीव फिरवला जात होता. ते स्पष्ट झाले आहे. मी चांगल्या ग्रेडने पास होणारा उमेदवार लुळा पांगळा नाही. म्हणत विरोधकांना धस यांनी प्रत्युत्तर दिले आहे.


सुरेश धस यांनी भाषणात मांडलेले मुद्दे 


• मतदारसंघात शेतकऱ्यांना जलसंधारणाच्या माध्यमातून कृष्णा खोरे योजनेअंतर्गत सीना मेहकरी, शिंपोरा ते कुंटेफळ प्रकल्प व पाईपलाईनचे काम अंतिम टप्प्यात
• ⁠ जायकवाडीच्या नाथसागरातून शिरुर का. व पाटोदा तालुक्याच्या डोंगर माथ्यावर शेतकऱ्यांना सिंचनासाठी पाणी उपलब्ध करून देण्यासाठी  मी कटिबद्ध राहील.
• ⁠रेल्वे भूसंपादनाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा करणार.
• ⁠ सिंदफना प्रकल्पाची उंची वाढवणे, सिंदफना नदीवर बँरेज उभारून शेतकऱ्यांना समाधानी करण्यासाठी प्रयत्न करणार.
• ⁠मतदारसंघात वन्यजीव व सामाजिक वनीकरण अंतर्गत हजारो हेक्टर क्षेत्र आहे, त्याठिकाणी देशी प्रजातीच्या औषधी वनस्पतीची लागवड करून त्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होईल यासाठी प्रयत्न करणार. 
• ⁠ रानडुक्करांच्या त्रासामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे होणारे नुकसान टाळण्यासाठी रानडुकरांचा बंदोबस्त करणार.
भाजपच्या संकल्पपत्रात आर्थिक व्यवस्थेवर भर देण्यात आला आहे.
 रोजगार, शेतकरी सहाय्यता आणि महिलांच्या कल्याणासाठी 25 गॅरंटी !
भाजप-महायुती आहे, तर गती आहे, महाराष्ट्राची प्रगती आहे! 


इतर महत्त्वाच्या बातम्या 


Eknath Shinde : ठोक डालेंगे, बटण.. बटण.. इतकं ठोकणार की समोरच्याचं डिपॉझिट जप्त होईल, एकनाथ शिंदेंचं आक्रमक भाषण


Uddhav Thackeray : लोकसभेला प्रज्वल रेवण्णाचे हात बळकट करा म्हणाले, आता संजय राठोडला मांडीवर घेतील; उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल