Sujat Ambedkar : ऐन निवडणुकीच्या (Maharashtra Election 2024) तोंडावर प्रकाश आंबेडकरांच्या (Prakash Ambedkar) आजारपणावेळची परिस्थिती ही आंबेडकर कुटुंबीयांसाठी सर्वच मोर्चांवर आव्हानात्मक होती, असं वक्तव्य त्यांचे सुपुत्र आणि वंचित बहुजन आघाडी (Vanchit Bahujan Aghadi) युवा नेते सुजात आंबेडकर (Sujat Ambedkar) यांनी केलंय. ते अकोला येथे 'एबीपी माझा'शी खास बातचीत करताना बोलत होते.
प्रकाश आंबेडकरांच्या आजारपणावेळच्या परिस्थितीवर पहिल्यांदाच त्यांच्या कुटुंबीयांतील प्रतिक्रिया पुढे आलीय. आपल्या वडिलांनी सातत्याने 'आंबेडकर' या 'ब्रँड नेम'ला धक्का लागू नये, याची काळजी घेतल्याचंही ते म्हणालेय. मात्र विरोधक सातत्याने कायम त्यांची बदनामी करत असल्याची खंत सुजात आंबेडकर यांनी व्यक्त केलीये. आपल्या बापाने ठरवलं असतं तर ते कायम सत्तेत मंत्री राहिले असतेय. मात्र, त्यांची बांधिलकी सर्वसामान्य माणूस आणि वंचित घटकांशी असल्याचं सुजात आंबेडकर म्हणालेत.
सत्ताधारी आणि विरोधकांच्या घराणेशाहीने हा मुद्दा निकालात
दरम्यान, राज्याच्या प्रत्येक भागात विधानसभा निवडणुकीत वंचितला मिळणारा प्रतिसाद प्रचंड असल्याचे ते म्हणाले. सुजाता आंबेडकर यांनी विधानसभा निवडणुकीत 40 वर सभा घेतल्यात. वंचित वर विरोधकांकडून होणारा बी टीमचा आरोप या निवडणुकीत पोचला गेल्याचं ते म्हणालेय. सत्ताधारी आणि विरोधकांच्या घराणेशाहीने हा मुद्दा निकालात काढल्याचं ते म्हणालेय.
हल्ल्यांचा हिशेब निवडणूक झाल्यावर घेऊ- सुजात आंबेडकर
दरम्यान, ऐन निवडणुकीच्या काळात राज्यभरात अनेक ठिकाणी वंचितचे उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर हल्ल्यांच्या घटना घडल्यायेत. झालेल्या या हल्ल्यांचा हिशेब निवडणूक झाल्यावर घेऊ, असा इशारा त्यांनी दिलाय. येत्या निवडणुकीनंतर राज्याच्या राजकारणात वंचितची भूमिका महत्त्वाची असेल असं ते म्हणालेय. निकालानंतर वंचित सरकारमध्ये असेल असेही ते म्हणालेत. कोणत्या पक्षाला पाठिंबा द्यायचा याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर होणार असल्यास ते म्हणालेय. दरम्यान, वडील म्हणून प्रकाश आंबेडकरांना कराव्या लागत असल्यास संघर्षावर एक मुलगा म्हणून सुजाता आंबेडकर पहिल्यांदाच भरभरून बोललेय.
राहुल गांधी यांचा प्रकाश आंबेडकरांना फोन, म्हणाले....;
काँग्रेस नेते आणि लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकरांना फोन केल्याची माहिती पुढे आली आहे. यावेळी राहुल गांधी यांनी प्रकाश आंबेडकरांच्या प्रकृतीची विचारणा करत चौकशी केलीय. ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत प्रकाश आंबेडकरांवर अँजिओप्लास्टी शस्त्रक्रिया करण्यात आली होती. या शस्त्रक्रियेनंतर प्रकाश आंबेडकर पुन्हा नव्याने निवडणूक प्रचारात सक्रिय झाल्याचे बघायला मिळाले आहे. प्रकाश आंबेडकर (Prakash Ambedkar) नुकतेच बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथे सभेसाठी आले असताना आंबेडकरांना राहुल गांधीचा यांचा फोन आला आहे. यावेळी राहुल गांधींनी प्रकाश आंबेडकर यांना चांगल्या प्रकृतीसाठी शुभेच्छा देत स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे.
इतर महत्वाच्या बातम्या