Numerology Of Mulank 3 : ज्योतिष शास्त्रानुसार, प्रत्येक अंकाचं विशेष महत्त्व असते. अंक ज्योतिष (Ank Shastra) शास्त्र हे मूलांकावर अवलंबून असतं. हे मूलांक 0 ते 9 अंकांच्या दरम्यान असतात. ज्याप्रमाणे राशीनुसार व्यक्तीचा स्वभाव ठरवला जातो त्याप्रमाणेच अंकशास्त्रात (Numerology) व्यक्तीच्या जन्मतारखेनुसार स्वभाव ठरवला जातो. त्यानुसार, आज आपण मूलांक (Mulank) 3 च्या संदर्भात जाणून घेणार आहोत. 


कोणत्याही महिन्याच्या 3, 12, 21 आणि 30 तारखेल्या जन्मलेल्या लोकांचा मूलांक 3 असतो. या लोकांचा स्वभाव नेमका कसा असतो हे आज आपण जाणून घेऊ. 


फार महत्त्वाकांक्षी असतात 


मूलांक 3 चा स्वामी ग्रह बृहस्पती आहे. त्यामुळे या जन्मतारखेचे लोक फार स्वाभिमानी असतात. या लोकांना कोणत्याही कतामासाठी इतरांपुढे हात पसरवायला आवडत नाही. तसेच, हे लोक कोणाच्याही आयुष्यात विनाकारण हस्तक्षेप करत नाहीत. तसेच, यांना कोणाकडून उपकार घ्यायला आवडत नाहीत. तसेच, हे लोक प्रचंड साहसी, वीर, शक्तिशाली आणि कधीच हार मानणारे नसतात. 


अभ्यासात असतात हुशार


या जन्मतारखेचे लोक हे फार अध्ययनशील असतात. अभ्यासात हे लोक फार हुशार असतात. तसेच, या जन्मतारखेच्या लोकांना विज्ञान आणि साहित्याची फार आवड असते. 
तसेच, हे लोक फक्त शिक्षणातच नाही तर अन्य क्षेत्रातही यश संपादन करतात.


'अशी' असते आर्थिक स्थिती


मूलांक 3 असणाऱ्या लोकांची आर्थिक स्थिती फारशी चांगली नसते. त्यांच्या आर्थिक स्थिती फार चढ-उतार असतात. मात्र, वयाच्या एका ठराविक काळानंतर या लोकांच्या आर्थिक स्थितीत चांगले बदल होतात. 


वैवाहिक जीवन कसं असतं? 


मूलांक 3 असणाऱ्या लोकांचे मित्र तर बरेच असतात. पण हे लोक इतरांवर पटकन विश्वास ठेवतात. यामुळे हे लोक फार लवकर धोका खातात. यांच्या प्रेमसंबंधातही फार चढ-उतार पाहायला मिळतात. पण, यांचं वैवाहिक जीवन फार सुखमय असतं. 


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.) 


हेही वाचा :       


Budh Gochar 2024 : ग्रहांचा राजकुमार बुधाचं होणार संक्रमण; 26 नोव्हेंबरपासून 'या' 5 राशींचा सुरु होणार सर्वात वाईट काळ