Solapur Bjp Meeting News : सोलापूर लोकसभा (Solapur Loksabha) मतदारसंघात भाजपचा पराभव झाला आहे. काँग्रेसच्या उमेदवार प्रणिती शिंदे (Praniti Shinde) यांनी भाजपचे उमेदवार राम सातपुतेंचा (Ram Satpute) परभव केला आहे. यानंतर लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवाच्या पार्श्वभूमीवर आज भाजपकडून चिंतन बैठक (Bjp Meeting) आयोजित करण्यात आली होती. भाजपाचे खासदार आणि सोलापूर निरीक्षक धनंजय महाडिक (Dhananjay Mahadik) यांच्या उपस्थितीत ही बैठक सुरु होती. यावेळी काही कार्यकर्त्यांनी कार्यक्रमातच गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. विकास वाघमारे, सुदर्शन यादव व यतिराज होनमाने, श्रीमंत बंडगर अशी गोंधळ घातलेल्या युवकांची नावे आहेत.
भीमा साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधात काम केल्याचा आरोप
खासदार धनंजय महाडिक यांची सत्ता असेलेल्या भीमा सहकारी साखर कारखान्याच्या संचालकांनी भाजपविरोधात काम केल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. मात्र, जिल्हाध्यक्ष सचिन कल्याणशेट्टी यांनी कार्यकर्त्यांना थांबवत वैयक्तिक म्हणणे मांडण्याची सूचना केली आहे. लोकसभेच्या पराभवाचे चिंतन करण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत हा प्रकार घडला आहे. लोकसभेतील पराभवानंतर पहिल्यांदाच ही बैठक आयोजित केली होती. दरम्यान गोंधळ सुरू होताच माध्यम प्रतिनिधींना बाहेर थांबवण्यात आले होते. गोधळानंतर बंद दाराआड बैठक सुरु आहे.
पराभव झालेल्या ठिकाणी भाजपच्या वतीनं चिंतन बैठकांचं आयोजन
दरम्यान, ज्या ज्या मतदारसंघात भाजपला पराभवाचा सामना करावा लागला आहे, त्या त्या मतदारसंघात भाजपच्या वतीनं चिंतन बैठकांचं आयोजन केलं जात आहे. नेमका परभाव का झाला? याची कारण शोधली जात आहेत. सोलापूर लोकसभा मतदारसंघातही भाजपला पराभवचा धक्का बसला आहे. या लोकसभा मतदारसंघात भाजपच्या वतीनं राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली होती. तर काँग्रेसकडून माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या आमदार प्रणिती शिंदे या निवडणुकीच्या रिंगणात होत्या. मात्र, या निवडणुकीत प्रणिती शिंदे यांनी मोठ्या फरकानं राम सातपुते यांचा पराभव केला होता.
सलग दोन टर्म म्हणजे 2014 च्या लोकसभा निवडणुकीत या मतदारसंघात सुशीलकुमार शिंदे यांचा परभाव करत शरद बनसोडे निवडूण आले होते. तर 2019 च्या लोकसभा निवडणुकीतही भाजपचे जय सिद्धेशवर स्वामी हे निवडूण आले होते. यावेळी त्यांनी सुशीलकुमार शिंदे यांचाच पराभव केला होता. यावेळी मात्र, गमावलेली जागा काँग्रेसनं पुन्हा मिळवली आहे.
महत्वाच्या बातम्या:
सोलापुरात भाजपचा दंगल घडवण्याचा प्रयत्न होता, निवडणूक निकालानंतर प्रणिती शिंदेंचा गंभीर आरोप