मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांची रणधुमाळी आता अंतिम टप्प्यात आली असून उमेदवारांचे अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. महायुती व महाविकास आघाडीतील ( MVA ) पक्षांच्या अनेक उमेदवारांनी आज अर्ज भरुन प्रतित्रापत्र सादर केलं. त्यामध्ये, शिवसेना युबीटी म्हणजेच ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनाही अर्ज दाखल केले आहेत. वरळी मतदारसंघातून उद्धव ठाकरें सुपुत्र आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी, उद्धव ठाकरे आणि आई रश्मी ठाकरे ह्याही उपस्थित होत्या. सर्वोत्तम वरळीसाठी... वरळीकरांच्या स्वप्नांसाठी... मशालच असे म्हणत आदित्य ठाकरेंनी दुसऱ्यांदा वरळीतून रणशिंग फुंकले आहे. दरम्यान, आदित्य ठाकरेंनी आज प्रतिज्ञापत्र सादर केलं, त्यामध्ये त्यांची एकूण संपत्ती समोर आली आहे. 


पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व आई रश्मी ठाकरे ह्यांच्या उपस्थितीत व तमाम वरळीकरांच्या आशीर्वादाने महाविकास आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून 182-वरळी विधानसभा मतदारसंघातून माझा उमेदवारी अर्ज दाखल केला, असे ट्विट करुन आदित्य ठाकरेंनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केल्याचा फोटो शेअर केला आहे. या प्रतिज्ञापत्रातून आदित्य ठाकरेंची संपत्ती जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार, त्यांची एकूण संपत्ती 21 कोटी 48 लाख रुपये असून त्यांची गुंतवणूक मोठी आहे. तसेच, रायगडमध्ये जमीन आणि मुंबईत 2 गाळे त्यांच्या नावावर आहेत. तर, एक गुन्हाही दाखल आहे. 


आदित्य ठाकरेंच्या संपत्तीची वैशिष्टे


आदित्य ठाकरे यांच्यावर 1 गुन्हा दाखल असून याप्रकरणी चार्जशीट दाखल झालेलं नाही. काही दिवसांपूर्वी लोअर परेलच्या ब्रिजसंदर्भात, डिलाईल रोड खुला केल्याप्रकरणी त्यांच्यावर हा गुन्हा दाखल झाला आहे. 


आदित्य ठाकरे यांच्या नावावर रायगड येथे काही एकर जागा, ज्याचं आताचं बाजार मूल्य 1 कोटी 48 लाख 51 हजार 350 रुपये आहे. 


आदित्य ठाकरे यांच्या नावावर ठाकुर्ली आणि घोडबंदर येथे दोन दुकानाचे गाळे आहेत. ज्याचं आताचं बाजारमूल्य 4 कोटी 56 लाख रुपये आहे. 


आदित्य ठाकरे यांच्याकडे BMW चार चाकी वाहन
आदित्य ठाकरे यांच्याकडे 1 कोटी 91 लाख 7 हजार 159 रुपयांचे दागिने आहेत


जंगम मालमत्ता - 15 कोटी 43 लाख 3 हजार 60
अचल मालमत्ता - 6 कोटी 4 लाख 51 हजार 350 रुपये


बँक खात्यात 2 कोटी 44 लाख 18 हजार 985 रुपये
बँक खात्यात फिक्स डिपॉसिट - 2 कोटी 81 लाख 20 हजार 723 रुपये


शेअर मार्केट गुंतवणूक - 70 हजार 
म्युच्युअल फंड - 10 कोटी 13 लाख 78 हजार 52 रुपये
बॉण्ड्स - 50 हजार रुपये


एकूण गुंतवणूक (स्वतः) - 10 कोटी 14 लाख 98 हजार 52 रुपये
LIC पॉलिसी - 21 लाख 55 हजार 741 रुपये


हेही वाचा


शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून विदर्भात 7 उमेदवार जाहीर; नव्या चेहऱ्यांना संधी, ही आहेत वैशिष्टे