Continues below advertisement

मुंबई : राज्यातील महापालिका (Election) निवडणुकांच्या अनुषंगाने सध्या राजकीय वातावरण तापलं असून शिवसेना-भाजप महायुतीचे नेते विरोधकांवर टीका करत आहेत. तर, विरोधकही सत्ताधाऱ्यांवर हुकूमशाही, पैसे वाटपासह अनेक आरोप करत आहेत. राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवरुन ठाकरे बंधू आणि शिंदे फडणवीस आमने सामने आले आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आज दै. सामनासाठी ठाकरे बंधूंची संयुक्त मुलाखत पार पडली. या मुलाखतीतून त्यांनी शिवसेना शिंदे गट आणि भाजपवर हल्लाबोल केला. त्यावर, सत्ताधारी पक्षाकडून प्रतिक्रिया येत आहेत. नुकतेच शिवसेना शिंदे गटात गेलेले प्रकाश महाजन (Prakash mahajan) यांनी या मुलाखतीवर प्रतिक्रिया देत थेट राज ठाकरेंवर (Raj Thackeray) बोचरी टीका केलीय.

राज्यात तीन वर्षापूर्वी एक मुलाखत झाली, त्याचा हा सिक्वल आहे. त्या मुलाखतीत राज ठाकरे सहज नव्हते, चित्रपट सृष्टीतील कोणी नसेल तर एका संपादकाला मुलाखत दिली म्हणत संजय राऊतांवर प्रकाश महाजन यांनी टीका केली. तसेच, महेश मांजरेकर याला कशाची भीती? त्याचे मित्र अंडरवर्ल्सचे आहेत, असेही त्यांनी म्हटले. राज ठाकरे वैफल्यग्रस्त झाले आहेत. कुठल्याही परिस्थितीत सत्ता मिळवायची, सत्तेसाठी चावडी केली. सत्तेसाठी कोणत्या थराला चालले आहेत, हिंदुत्व कुठे आहे? चंदू मामा कुठे आणि रशीद मामूला त्यांनी जवळ केलंय, अशा शब्दात प्रकाश महाजन यांनी राज ठाकरेंवर बोचरी टीका केली.

Continues below advertisement

मराठी माणसांसाठी यांनी काय केलं?

मराठी माणूस हा त्यांच्या प्रचाराचा मुखवटा आहे, त्यांना मराठी माणसाची काळजी आहे म्हणून ते सोबत नाहीत. तीन वर्षापूर्वीच्या मिळकतीत काही बदल झाला नाही, त्यांची सत्ता येणार नाही हे 100 टक्के आहे. मुंबईत सत्ता महायुतीची येणार आहे. मराठीसाठी यांनी काय केलं? राज ठाकरे हे उध्दव ठाकरे यांच्यासोबत जाऊन आनाडी नाहीत. आज मनसेतून लोक बाहेर पडत आहेत, पण मुंबईची सत्ता मिळवण्यासाठी हे चाललं आहे, असेही प्रकाश महाजन यांनी म्हटले.

दरम्यान, संतोष धुरींनी मनसे सोडून भाजपात प्रवेश केल्याबाबत एका वाक्यात महाजन बोलले. राज ठाकरेंभोवती ठरावीक वर्तुळ आहे. संदीप देशपांडेही आनंदी नाही, धुरी यांनी संदीपला विचारल्याशिवाय ते बाहेर पडले नसतील. पन्नास खोके मला माहीत नाही. पण, एकनाथ शिंदे यांना एक खोके दिले आहे हे माहीत आहे. तुमचा विषय पैशाचा आहे. तुम्ही आरोप कोणावर करता. एकजण गुजरातला जातो, त्याच्या मागे जातीधर्माचे नाही तरीही पन्नास लोक बाहेर जातात, असे म्हणत एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीचे महाजन यांनी समर्थन केले.

शरद पवार यांनी त्यांच्या आत्मचरित्रात काय लिहिलं आहे, राज ठाकरे यांचे पाणचट वक्तव्य आहे. मराठवाड्यात शिवसेना पहिल्या क्रमांकावर आहे. उध्दव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण केलच नाही., उद्या सत्ता आली तर दोघांच्या बायकोत भांडण लागेल. तुम्ही चावडीवर आले, तुमचं सूप काढलं.

ते मुंबईत नाही, एसीत जन्मले

मराठी हे बुजगावणं उभ केलं आहे, हे मुंबईत कुठे जन्मले, ते एसीत जन्मले आहेत. मुंबईत जन्मले यांनी मुंबईचे रस्ते केले, विकास केला. निवडणुकीत यश मिळावं म्हणून मराठीचा मुद्दा काढला. कोहिनूर मिलमध्ये मराठी माणसाला काम देऊ म्हणाले, पण मायकल जॅक्सनचा कार्यक्रम घेतला त्याचा हिशोब देत नाहीत, असेही महाजन यांनी सांगितले.

हेही वाचा

रोहित पवार आजपासूनच घड्याळाच्या प्रचारात; अजित पवारांसोबत पुण्यातून भाजपवर हल्लाबोल करणार?