Continues below advertisement

मुंबई : राज्याचं लक्ष लागलेल्या मुंबईतील (Mumbai) शिवाजी पार्कवरुन आज शिवशक्ती सभेच्या माध्यमातून ठाकरे बंधूंची तोफ धडाडत आहे. येथील सभेत सर्वप्रथम मनसेच्या संदीप देशपांडे यांनी भाषण केलं, ठाकरे हा ब्रँड नाही, ठाकरे हा विचार आहे, विचार कधीही संपत नसतो, असे म्हणत देशपांडेंनीभाजपवरहल्लाबोल केला. त्यानंतर, शिवसेना आमदार आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी सुरुतीलाच, ही निवडणूक गटर, वॉटर, मीटरचीनिवडणूकअसूनभाजपमहायुतीचेनेतेमोठमोठीआश्वासनेदेतअसल्याचंम्हटले. यावेळी, आदित्ययांनीमुख्यमंत्रीदेवेंद्रफडणवीस (Devendra Fadnavis) यांचीमिमिक्रीकेली. विशेषम्हणजे, त्यांच्याव्हायरलझालेल्याव्हिडिओचादाखलाहीयावेळीत्यांनीदिला.

मनसेप्रमुख राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आज एका सभेत आज बोलणार आहेत, करून दाखवलेल्या कामावर आपणही निवडणूक लढवत आहोत. भाजपच्याहोर्डिंग वर 2 चेहरे आहेत, त्या चेहऱ्यांचं मुंबईसाठी योगदान काय? असा सवाल आदित्य यांनी विचारला. तसेच, गिफ्ट सिटी मुंबईतून गुजरातला नेली कोणी? उद्योगधंदे गुजरातला कोणी नेली? हे त्यांचं योगदान आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादी पक्ष इथं आहे, तिकडे आहेत ते पक्ष नाहीत टोळ्या आहेत. मनसेचंबोलायचं तर राज ठाकरेंच्या डोळ्यात नाशिक बद्दल विशेष प्रेम दिसतं, असे आदित्य यांनी म्हटले. तसेच, यावेळी त्याच्या व्हायरलव्हिडिओचा संदर्भ देत मला आजच्या सभेतही मुख्यमंत्र्‍यांची मिमिक्री करण्याचं अनेकांना म्हटलं आहे. त्यामुळे... म्हणत आदित्य ठाकरेंनी शिवाजी पार्कवरुनहीदेवेंद्रफडणवीसांचीमिमिक्री केली. आमची मुंबईत सत्ता येणार... मोदी साहेब भाजपचाजलवा दिसणार... आपली सत्ता येणार... असे मुख्यमंत्र्‍यांच्या स्टाईलने आवाज काढत आदित्य यांनी म्हटले. यावेळी, उपस्थितांनी टाळ्या वाजवत, हसून दाद दिली. दरम्यान, आदित्य ठाकरे यांचा एका कॉर्नरसभेतीलाव्हिडिओव्हायरल झाला असून त्यातही त्यांनी मुख्यमंत्र्‍यांची मिमिक्री केलीय.

Continues below advertisement

फडणवीसांना टोला

आदित्य ठाकरेंनी आपल्या भाषणात लाव रें तो फोटो म्हणत राज ठाकरेंची स्टाईल मारली, यावेळी राज ठाकरे माझे काका आहेत, थोडी लिबर्टी घेतो असेही ते म्हणाले. कोस्टल रोडचे भूमिपूजनचे फोटो तुम्हाला दाखवतो... देवेंद्र फडणवीस कुठे आहेत... आता फडणवीस तुम्हाला 3000 हजार रुपये देतो... लगेच देतो... दाखवा तुमचे फोटो कुठे आहेत? असे चॅलेंजच आदित्य यांनी फडणवीसांना दिले. तर, भाजपच्या अण्णामलाईला सांगतो... स्वतः तुमचा मतदार संघ बघा, तुमचं डिपॉझिट जप्त झालं आहे, आम्हाला सांगू नका मुंबई काय आहे? अशा शब्दात पलटवार केला. 

दरम्यान, आदित्य ठाकरे यांच्या शिवाजी पार्कवरील भाषणाचं राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील यांनी भरभरुन कौतुक केलं. उद्धवजी आता तुम्ही महाराष्ट्र सांभाळायला मोकळे झालात, कारण मुंबईची खडान खडा माहिती असलेलं अतिशय चांगलं भाषण आदित्य यांनी केलंय, ते आता मुंबई सांभाळायला सक्षम आहेत, असेही जयंत पाटील यांनी म्हटले.

शिवाजी पार्कवरशिवसैनिकांची मोठी गर्दी

मोठ्या संख्येने शिवसैनिक आणि मनसैनिकशिवतीर्थावर दाखल झाले असून घोषणाबाजी करत, वाजत गाजत कार्यकर्त्यांनी शिवाजी पार्क परिसर दुमदुमल्याचं पाहायला मिळालं. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी स्वतःमुंबईतील बहुतांश शाखांमध्ये भेट देत आजच्या सभेसाठी येण्याचं आवाहन केलं होतं. आपल्या प्रत्येक शाखा भेटीत राज ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शिवतीर्थावर या, विरोधकांना मशालीने जाळायचं आहे, तुमच्याशी भरभरून बोलायचं आहे, असेही म्हटले होते. त्यामुळे, दोन्ही पक्षाचे कार्यकर्तेही आजच्या सभेसाठी उत्सुक होते.

हेही वाचा

Video: मोठी बातमी! पुण्यात देवाभाऊंचा रोड शो, स्वागताच्या फटाक्यांनी इमारतीला आग; मोबाईल टॉवर जळून खाक