मुंबई : शिरुर लोकसभेत कुणी कितीही कोल्हेकुई केली, तरी निवडणूक आपणच जिंकणारच असा विश्वास शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी व्यक्त केला आहे. शिवबंधन सोडून राष्ट्रवादीत प्रवेश केलेले डॉ. अमोल कोल्हे शिरुरमधून लोकसभेच्या रिंगणात उतरण्याची चर्चा आहे, या पार्श्वभूमीवर शिवाजीराव पाटलांनी हा टोला लगावला.
राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंना मराठा म्हणून नव्हे तर माळी म्हणून रिंगणात उतरवलं आहे. गेल्या 15 वर्षात या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीला उमेदवार सापडला नव्हता, अशी टीकाही शिवाजीरावांनी केली. पुण्यातील शिरुर लोकसभा मतदारसंघात शिवसेनेचं वर्चस्व आहे.
शिवाजीराव आढळराव पाटील हे शिरुरचे विद्यमान खासदार असून सलग तिसऱ्यांदा ते शिवसेनेच्या तिकीटावर निवडून आले आहेत. 2014 मधील निवडणुकीत तीन लाखांपेक्षा जास्त मताधिक्याने त्यांनी राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा पराभव केला होता.
'तरुणांना विधायक वाटेची गरज आहे असे वाटतं. ही जाणीव फक्त शरद पवार यांच्या राष्ट्रवादीमध्ये आहे. देशपातळीवरची दिशा बदलत आहे आणि यामध्ये माझा खारीचा वाटा असावा, म्हणून मी हा निर्णय घेत आहे' असं म्हणत डॉ. अमोल कोल्हेंनी राष्ट्रवादीचा झेंडा खांद्यावर घेतला होता.
संबंधित बातम्या
डॉ. अमोल कोल्हेंच्या मुलीचं टीव्हीवर दमदार पदार्पण
कोणी कितीही कोल्हेकुई करुदे, निवडणूक मीच जिंकणार, शिवाजीराव पाटलांचा टोला
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
05 Mar 2019 02:14 PM (IST)
राष्ट्रवादीने अमोल कोल्हेंना मराठा म्हणून नव्हे तर माळी म्हणून रिंगणात उतरवलं आहे. गेल्या 15 वर्षात या मतदारसंघासाठी राष्ट्रवादीला उमेदवार सापडला नव्हता, अशी टीकाही शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटलांनी केली.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -