Chandgad Kolhapur : कोल्हापुरातील चंदगड विधानसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील (Shivaji Patil) थोडक्यात बचावले आहेत. शिवाजी पाटील यांचा विजय घोषीत झाल्यानंतर कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. त्यानंतर त्यांचं काही महिला औक्षण करत असताना त्यांच्या अंगावर गुलाल पडल्याने आगीचा भडका उडाला. आगीच्या भडक्यात आमदार शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांच्यासहीत औक्षण करणाऱ्या काही महिला जखमी झाल्याची माहिती आहे. काल (शनिवारी) विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर संध्याकाळच्या सुमारास विजयी मिरवणुकीच्या वेळी शनिवारी रात्री हा प्रकार घडला आहे.
नेमकं काय घडलं?
चंदगड विधानसभा मतदारसंघातील नवनिर्वाचित आमदार शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांच्या विजयी मिरवणुकी वेळी महिला औक्षण करत असताना जेसीबीच्या माध्यमातून शिवाजी पाटील यांच्या अंगावर गुलाल टाकला जात होता. त्याचवेळी आगीचा भडका उडाला. या घटनेत शिवाजी पाटील थोडक्यात बचावले आहेत. या घटनेमध्ये काही महिला जखमी झाल्याची माहिती आहे. या घटनेने परिसरात एकच गोंधळ उडाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
काल (शनिवारी) विधानसभा निवडणुकांचा निकाल हाती आला त्यानंतर राज्यभरात विजयी आमदारांच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी जल्लोष साजरा केला. यावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघातून अपक्ष उमेदवार शिवाजी पाटील (Shivaji Patil) विजयी झाले आहेत. यावेळी कार्यकर्ते जल्लोष साजरा करत होते. त्यावेळी महिलांनी शिवाजी पाटील यांचं औक्षण करण्यासाठी पुढे आल्या त्याचवेळी त्यांच्या अंगावर जेसीबीने गुलाल टाकण्यात आला. गुलाल आणि आग यांचा संपर्क आल्याने एकदम भडका उडाला. या घटनेमध्ये तीन ते चार महिला जखमी झाल्या आहेत. शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांना देखील काही प्रमाणात भाजलेले आहे. त्यांच्यावर देखील उपचार करण्यात आलेले आहेत. नवनिर्वाचित आमदार औक्षण करताना जखमी झाल्याचं सर्वत्र बोलले जाते. या घटनेचा व्हिडिओ देखील (Video) समोर आला आहे.
चंदगडमधून अपक्ष उमेदवाराचा गुलाल
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड विधानसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार म्हणून शिवाजी पाटील (Shivaji Patil) यांनी विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या पक्षाचे (NCP) राजेश नरसिंगराव पाटील, महाविकास आघाडीतून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार (NCP Sharad Pawar) पक्षाचे कुपेकर-बाभुळकर नंदाताई हे रिंगणात होते, तर अपक्ष उमेदवार म्हणून शिवाजी पाटील यांनी अर्ज दाखल केला होता. शिवाजी पाटलांनी 24 हजार 134 इतक्या मताधिक्याने बाजी मारली.