Shiv Sena Mumbai : दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठीच्या शिलाई मशीन लपवल्याचा आरोप शिंदे गटाच्या आमदार प्रकाश सुर्वे यांनी शिवसेनेच्या माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्यावर केला आहे. माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी त्यांच्यावरील सर्व आरोप फेटाळले आहेत. 


मुंबई उपनगरातील दहिसर पूर्व प्रभाग क्रमांक 3 मध्ये शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी महापालिकेच्यावतीने दारिद्र्य रेषेखालील महिलांसाठीच्या 150 शिलाई मशीन लपवून ठेवल्याचा प्रकार नुकताच उघडकीस आला आहे. शिंदे गटाच्या महिला कार्यकर्त्यांनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. या विरोधात शिंदे गट आक्रमक झाला असून माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी करण्यात आली आहे. मात्र हे सर्व आरोप माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी फेटाळले असून ते आरोप बिनबुडाचे आणि खोटे असल्याचे असल्याचे म्हटले आहे.


महापालिकेकडून झोपडपट्टी भागातेली गरजू आणि दारिद्र्य रेषेखालील महिलांना शिलाई मशीन रोजगार निर्मितीसाठी देण्यात येतात.मात्र बाळकृष्ण ब्रीद यांनी यांच्या नगरसेवक काळात उपलब्ध झालेल्या मशीन महिलांमध्ये न वाटता त्या समाज मंदिराच्या कार्यालयात लपवून ठेवल्या.हा प्रकार शिंदे गटाच्या महिला विधानसभा संघटका मीना पाणमंद आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला. आता या विरोधात शिंदे गट आक्रमक झाला असून या माजी नगरसेवक ब्रीद विरोधात गुन्हा दाखल करून कारवाईची मागणी केली आहे.


आमदार प्रकाश सुर्वे यांनी आरोप केला आहे की माजी नगर सेवक बाळकृष्ण ब्रीद यांनी पालिका निवडणुकीत हे सर्व शिलाई मशीन वाटणार होते. मात्र त्या आदी आमचे कार्यकर्ते नि ही घोटाळा उघडकीस आणलं आहे.  मात्र आमदार प्रकाश सुर्वे चा आरोप वर शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे माजी नगर सेवक उत्तर दिले आहे की गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटांचे काही समर्थक माझ्यावर शिलाई मशिनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आहेत. शिलाई मशीन लपवून ठेवत आहेत हा चुकीचा आरोप आहे. ज्या मशिनवर आरोप होत आहे ते नगर सेवक निधीचे मशिन असून, ते बीएमसीने ठेवले होते, आणि लाभार्थी महिलांना देण्यासाठी ठेवले होते,त्यावर महापालिकेचे पत्रही आहे. 


यापूर्वीही हे मशिन लाभार्थी महिलांना देण्यात आले आहे, ज्या महिलांचा संपर्क झाला नाही अशा महिलांना देण्यासाठी हे मशीन ठेवण्यात आले होते, शिंदे समर्थकांना जनतेचा पाठिंबा नाही, त्यामुळे ते हे सर्व करत आहेत, असे ब्रीद म्हणाले. 


शिवसेनेचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद म्हणाले की, गेल्या दोन दिवसांपासून शिंदे गटांचे काही समर्थक माझ्यावर मशिनमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आहेत, मशीन लपवून ठेवत आहेत हा चुकीचा आरोप आहे. ज्या मशिनवर आरोप होत आहे ते नगर सेवक निधीचे मशिन असून, ते बीएमसीने ठेवले होते, आणि लाभार्थी महिलांना देण्यासाठी ठेवले होते, त्यावर महापालिकेचे पत्रही आहे. यापूर्वीही हे मशिन लाभार्थी महिलांना देण्यात आले आहे. ज्या महिलांचा संपर्क झाला नाही अशा महिलांना देण्यासाठी हे मशीन ठेवण्यात आले होते, शिंदे समर्थकांना जनतेचा पाठिंबा नाही, त्यामुळे ते हे सर्व करत आहेत, असे बाळकृष्ण ब्रीद म्हणाले.