Maharashtra Vidhan Parishad Election Result 2024  : शेतकरी कामगार पक्षाचे नेते जयंत पाटील यांचा विधानपरिषद निवडणुकीत पराभव झाला आहे. जयंत पाटील हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाकडून समर्थन पुरस्कृत उमेदवार होते. विधानपरिषदेच्या 11 जागांसाठी महायुतीचे 9 तर महाविकास आघाडीचे 3 असे 12 उमेदवार मैदानात होते. दोन्ही गटांकडून आमचे सर्व उमेदवार निवडून येणार, असा दावा केला जात होता. त्यामुळे एका उमेदवाराचा पराभव होणार होता, मात्र तो नेमका कोणाचा हे निकालानंतरच स्पष्ट झाले. शेकपच्या जयंत पाटील यांचा पराभव झाला आहे. जयंत पाटील यांना पहिल्यापासूनच आघाडी मिळाली नाही. पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये जयंत पाटील यांना दुहेरी आकडाही ओलांडता आला नव्हता. विजयासाठी जयंत पाटील यांना 23 संख्यापर्यंत पोहचायचं होतं. पण जयंत पाटील यांना फक्त 12 मते मिळाली. पराभवानंतर जयंत पाटील संपत्प झाले होते. मतमोजणी सुरु असतानाच त्यांनी काढता पाय घेतला होता. मिळालेल्या माहितीनुसार, ते तात्काळ अलिबागसाठी रवाना झाले होते.

Continues below advertisement

पराभवानंतर जयंत पाटील काय म्हणाले...

विधानपरिषदेत पराभव झाल्यानंतर जयंत पाटील तडकाफडकी अलिबागसाठी रवाना झाले. एबीपी माझाने त्यांच्याशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्यांनी स्पष्ट प्रतिक्रिया देण्यास नकार दिला. आता प्रतिक्रिया द्यायला नको, असे त्यांनी सांगितलं. मविआचं काय चुकलं यावर पाटील म्हणाले,"माझी बारा मते मला मिळाली. काँग्रेसची मते त्यांना मिळाली. काँग्रेसची काही मते फुटली. जाऊदे आता नको बोलायला. "

Continues below advertisement

जयंत पाटालांचा पराभव कुणी केला ?

शेकपच्या जयंत पाटलांचा तिन्ही पक्षाने मिळून पराभव केला, असे सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले. महाविकास आघाडीची मते फुटली, त्यांची रणनिती चुकल्याचेही मुनगंटीवार यांनी सांगितलं.  

हा पराभव मनाला वेदना देणारा - सत्यजीत तांबे

शेतकरी कामगार पक्षाचे जयंत पाटील साहेब यांचा आजच्या विधानपरीषदेच्या निवडणूकीतील पराभव हा मनाला वेदना देणारा आहे. भाई जयंत पाटील हे विधानपरिषदेच्या सभागृहातील एक ज्येष्ठ व अनुभवी सदस्य होते. आमच्या सारख्या नव्या व तरुण सदस्यांचे ते मार्गदर्शक होते. सभागृहातील त्यांची अनुपस्थिती सर्वांना नक्कीच जाणवेल, असे सत्यजीत तांबे म्हणाले.

कोणते उमेदवार विजयी? 

भाजपचे विजयी उमदेवार

1) योगेश टिळेकर - 26 मते2) पंकजा मुंडे - 26 मते3) परिणय फुके- 26 मते4) अमित गोरखे - 26 मते5) सदाभाऊ खोत - 24

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार1) भावना गवळी - 2) कृपाल तुमाने

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)

1. शिवाजीराव गर्जे2. राजेश विटेकर

काँग्रेस विजयी उमेदवार1) प्रज्ञा सातव - 26

शिवसेना ठाकरे गट 1) मिलिंद नार्वेकर

काँग्रेसची आठ मतं फुटली - 

दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा दिसून आला. विधानपरिषदेच्या निवडणुकीत काँग्रेसची आठ मते फुटल्याचं समोर आलेय. त्यामुळे लोकसभेला दमदार यश मिळालेल्या काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.  दुसरीकडे ठाकरेंना शिंदेंच्या शिवसेनेतील एकही मतं फोडता आले नाही, तर शरद पवारांच्या राष्ट्रवादीलाही अजितदादाच्या राष्ट्रवादीचं मत फोडता आले नाही. महायुतीनं दणदणीत विजय मिळवला. 9 जागांवर महायुतीचा विजय झाला.