Baramati Vidhan Sabha : महाविकास आघाडीमध्ये (Maha Vikas Aghadi) जागावाटपावरून अजूनही काथ्याकूट सुरूच आहे. त्यामुळे महायुतीचे जवळजवळ 182 उमेदवार जाहीर होऊनही महाविकास आघाडीची मात्र अजूनही चर्चांवर चर्चा सुरूच आहे. त्यामुळे पहिली यादी येणार तरी कधी? असाच प्रश्न निर्माण झाला आहे. दरम्यान महाविकास आघाडीची यादी जरी जाहीर झाली नसली तरी अनेक ठिकाणी उमेदवार मात्र निश्चित झाले आहेत.
युगेंद्र पवार हेच बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात उमेदवार असतील
बारामतीमध्ये अजित पवार यांच्या विरोधात उमेदवार कोण असणार? याची सुद्धा चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून शरद पवार गटाकडून बारामतीमध्ये कोणाला संधी देणार?अशी चर्चा रंगली होती. दरम्यान आता युगेंद्र पवार हेच बारामतीमधून अजित पवार यांच्याविरोधात उमेदवार असतील असे स्पष्ट सुतोवाच राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी केले आहेत.
जितेंद्र आव्हाड म्हणाले की बारामतीमधून युगेंद्र पवार हेच उमेदवार असतील असे मला वाटते, अशी प्रतिक्रिया दिली. मुंब्रामधून अजित पवार यांनी आव्हा यांच्या विरोधात नाजीम मुल्ला यांना उमेदवारी देण्यात आली आहे. या संदर्भात विचारण्यात त्याला ते म्हणाले की माझ्या विरोधात कोणीतरी उभा राहणारच आहे. पवार साहेब माझे दैवत असल्याचे ते म्हणाले. दरम्यान जागा वाटपाचे अनुषंगाने विचारले असते ते म्हणाले की आज संध्याकाळपर्यंत जागांचा तिढा सुटणार आहे. पत्रकार परिषद आज होणार असून मात्र वेळ ठरली नसल्याचे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या