मुंबई : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज भरण्यास आजपासून सुरूवात झाली आहे. भाजपने उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आघाडी घेत महायुतीमधील 99 उमेदवारांची नावे घोषित केली. त्यामुळे, या 99 उमेदवारांकडून प्रचाराला व मतदारसंघात जोमाने काम सुरू झालं आहे. दुसरीकडे अजित पवार यांनीही राष्ट्रवादीच्या (NCP) उमेदवारांना एबी फॉर्म दिल्यामुळे उमेदवारांच्या रांगा पक्षाच्या नेत्यांकडे लागल्या आहेत. त्यातच, आज महाविकास आघाडीची नावे जाहीर होण्यापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे व शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार एबी फॉर्म घेऊन जात आहेत. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांकडून (Sharad pawar) खासदार निलेश लंकेंच्या (Nilesh Lanke) पत्नी राणी लंके यांना उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे, अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राणी लंके ह्या पारनेर विधानसभा मतदारसंघातून उमेदवार असतील. 


शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून देखील जे उमेदवार निश्चित झाले आहेत त्यांना एबी फॉर्म द्यायला सुरुवात झाली आहे. मुंबईतून घाटकोपर पूर्वसाठी राखी जाधव, चिपळूण विधानसभेसाठी प्रशांत यादव, पारनेर विधानसभेसाठी राणी लंके यांना एबी फॉर्म देण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. मतदारसंघात प्रचारासाठी उमेदवारांना तत्काळ कामाला लागता यावं, यासाठी पक्षाकडून तत्काळ एबी फॉर्म देण्यात येत असल्याची माहिती आहे. तर, शिवसेना ठाकरे गटाकडून उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात येत आहेत. शिवसेना ठाकरे गटाकडून आजपासून एबी फॉर्म द्यायला सुरवात झाली असून ज्या जागावर तिढा नाही त्या मतदार संघातील उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आला आहे. राजापूर लांजा मतदार संघांचे विद्यमान आमदार राजन साळवी यांनी आज मातोश्रीमधून एबी फॉर्म स्वीकारला. तसेच, कुडाळ विधानसभेचे आमदार वैभव नाईक यांचा देखील एबी फॉर्म प्रतिनिधीने स्वीकारला आहे. 


दरम्यान, शरद पवारांच्या राष्ट्रवादीत इस्लामपूरमधून जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील इंदापूरमधून रिंगणात असतील. काटोलमधून माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे रिंगणामध्ये असतील. कर्जत जामखेडमधून रोहित पवार रिंगणात असतील. घनसावंगी मतदारसंघातून राजेश टोपे, तर मुंब्रामधून जितेंद्र आव्हाड असतील. कवठे महाकाळमधून स्वर्गीय आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित पाटील, कराड उत्तरमधून बाळासाहेब पाटील, कोरेगावमधून शशिकांत शिंदे, माळशिरसमधून उत्तमराव जानकर, सिंदखेडराजामधून राजेंद्र शिंगणे, राहुरीमधून प्राजक्ता तनपुरे, मुक्ताईनगरमधून रोहिणी खडसे, कागलमधून समरजितसिंह घाटगे, इचलकरंजीमधून मदन कारंडे आणि चंदगडमधून डाॅ. नंदिनी बाभुळकर यांचा संभाव्य उमेदवारांच्या यादीत समावेश आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष संभाव्य यादी


१) जयंत पाटील- इस्लामपूर
२) रोहित पाटील - तासगाव कवठे महांकाळ
३) मानसिंग नाईक- शिराळा
४) बाळासाहेब पाटील- कराड उत्तर
५) शशिकांत शिंदे- कोरेगाव
६) दीपक चव्हाण- फलटण
७) शिरुर- अशोक
८) इंदापूर- हर्षवर्धन पाटील 
९) वडगाव शेरी- बापू पठारे
१०) माळशिरस- उत्तमराव जानकर
११) कर्जत जामखेड- रोहित पवार
१२) काटोल- अनिल देशमुख
१३) विक्रमगड- सुनील भुसारा
१४) घनसावंगी - राजेश टोपे 
१५) मुंब्रा - जितेंद्र आव्हाड 
१६) जिंतूर- विजय भांबळे
१७) अहेरी- भाग्यश्री अत्राम
१८) सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे
१९) उदगीर- सुधाकर भालेराव
२०) घाटकोपर पूर्व - राखी जाधव 
२१) चिपळूण- प्रशांत यादव
२२) राहुरी -प्राजक्त तनपुरे
२३) मुक्ताईनगर- रोहिणी खडसे
२४) अकोले- अमित भांगरे
२५) पारनेर- राणी लंके
२६) बीड- संदीप क्षीरसागर
२७) केज- पृथ्वीराज साठे
२८) आंबेगाव- देवदत्त निकम
२९) जुन्नर- सत्यशील शेरकर
३०) इचलकरंजी- मदन कारंडे
३१) भूम परंडा- राहुल मोटे
३२) दौंड- रमेश थोरात
३३) कागल - समरतिजसिंह घाटगे 
३४) गंगापूर - सतीश चव्हाण 
३५) चंदगड - डाॅ. नंदाताई बाभूळकर