Ankush Kakde मुंबई : राज्यातील फडणवीस सरकारचं पहिल विशेष अधिवेशन काल (शनिवार) पासून सुरू झालं असून पहिल्याच दिवशी ईव्हीएमच्या (EVM) मुद्दयावरुन विरोधकांनी विधानसभा परिसरात गोंधळ घातला. तर, महाविकास आघाडीच्या सर्वच आमदारांनी शपथविधीकडे पाठ फिरवल्याचं पाहायला मिळालं. मात्र, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि शिवसेना युबीटी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं फोनवर बोलणं झाल्यानंतर या आमदारांनी शपथ घेण्याचा निर्णय घेतला आहे. 


दरम्यान, शरद पवारांनी कोल्हापुरातून पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी, सत्ताधारी पक्षाला ईव्हीएमवरुन टोला लगावत काही आकडेवारी देखील मांडली. पण, ईव्हीएमवर आत्ताच बोलणं हे योग्य नसल्याचंह ते म्हणाले. त्यानंतर, मुख्यमंत्री व भाजप नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीही आकड्यांना आकड्यांनीच उत्तर देत शरद पवारांना (Sharad pawar) प्रत्युत्तर दिलं. तसेच, पवार साहेब तुम्ही तरी आपल्या सहकाऱ्यांना आत्मपरीक्षण करण्याचा सल्ला द्याल, अशी अपेक्षा असल्याचे म्हटले. दरम्यान याच मुद्याला घेऊन आता राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी प्रतिक्रिया देत देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस पवार साहेबांना सला देऊ लागले आहेत, याचा मला आनंद असल्याचे अंकुश काकडे म्हणाले आहे.


तर आम्ही ईव्हीएमवर आक्षेप नोंदवणार नाही- अंकुश काकडे


निवडणुकी संदर्भात पवार साहेबांनी यापूर्वी स्पष्ट केले आहे. कोणत्या कायद्याने ही बंदी घातली हे विचारले आहे. प्रत्यक्षात मते गेली कुठं हा सवाल पवार साहेबाचा होता.  मारकडवाडीच्या लोकांनी मोठं पाऊल उचलले आहे. जी मत मिळाले आहेत, त्यावरून लोकमाणस कोणाच्या बाजूने होतं, हे स्पष्ट होतं. इतर देशात ईव्हीएम बंद करून बॅलेट पेपरवर निवडणूक घेतल्या जातात. मग आपल्या देशात बॅलेट पेपरवर मतदान घेण्याला काय हरकत आहे? एकदा सोक्षमोक्ष होऊ द्या. बॅलेट पेपर झालेल्या निवडणुकीत आमचा पराभव झाला तर आम्ही ईव्हीएमवर आक्षेप नोंदवणार नाही, असेही अंकुश काकडे म्हणाले.   


....त्यामुळे कुठेतरी पक्षपातीपणा दिसतो


सुप्रीम कोर्टावर टीका करण्याचा कोणाला अधिकार नाही, पण विधानसभेच्या निवडणुका झाल्यानंतर  स्थानिक स्वराज्य संस्था संदर्भात सुप्रीम कोर्ट निर्णय घ्यायला तयार होतं. यामध्ये कुठेतरी पक्षपाती पणा दिसतो. दरम्यान अबू आजमी संदर्भात बोलायचे झालं तर, महायुतीला मोठ बहुमत मिळाल्यानंतर कुठेतरी सत्तेचा फायदा मतदारसंघाला झाला पाहिजे, अशी त्यांची भूमिका असते. संधी साधू माणसे असतात, त्यांनी पक्ष बदलला तर फारसा वेगळं वाटत.  असेही अंकुश काकडे म्हणाले.


हे ही वाचा