कोल्हापूर : कोल्हापुरातील पेठा हा कोल्हापूरचा आत्मा आहे, त्या स्वाभिमानाने जगणाऱ्या आहेत. हा आत्मा गद्दारीचा नाही, एकदा ठरलं की करेक्ट कार्यक्रम करायचा म्हटला की करायचा, अशा शब्दात काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी हल्लाबोल केला. काल (8 नोव्हेंबर) संध्याकाळी मिरजकर तिकटीला महाविकास आघाडी पुरस्कृत कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार राजेश लाटकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आमदार सतेज पाटील, खासदार शाहु छत्रपती महाराज, सरोज पवार- पाटील (माई) यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरजकर तिकटी येथे झाला. यावेळी आमदार जयंत आसगांवकर, आमदार हसन मौलाना, काँग्रेस निरिक्षक सुखवंतसिंह ब्रार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी बोलताना सतेज पाटील यांनी घणाघाती हल्ला चढवला. 


पण काळजी करू नका बंटी पाटील तुमच्या पाठीशी


सतेज पाटील म्हणाले की, पुढील दहा दिवसांमध्ये धमकीच फोन यायला सुरुवात होतील, पण काळजी करू नका बंटी पाटील तुमच्या पाठीशी असल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की राजेश लाटकर तुमचा भाग विचारे माळ, कदमवाडी सदर बाजार जरी असला तरी तुम्हाला जर सर्वाधिक लीड हे कोल्हापूरच्या पेठांमधूनच मिळेल. पाटील यांनी रस्त्यांच्या टक्केवारीवरून सुद्धा हल्लाबोल केला. ते म्हणाले की राजेश क्षीरसागर यांनी शंभर कोटींच्या रस्त्यांचे डांगोरा पीटत आहेत. परंतु ते रस्ते दुर्बिणीतून शोधण्याची वेळ कोल्हापूरकरांवर आली आहे. साडेचार हजार कोटीतून केलेले रस्ते कुठे आहेत अशी विचारणा सुद्धा त्यांनी यावेळी केली. ते म्हणाले की ही निवडणूक राजेश लाटकर विरुद्ध राजेश क्षीरसागर अशी नाहीतर क्षीरसागर विरुद्ध कोल्हापूरकर अशी आहे. देशात, राज्यात काय चालला आहे हे कोल्हापूर कधीच बघत नाहीत. कोल्हापूरचा करंट वेगळाच असल्याचे म्हणाले. कोल्हापूरची ताट मानेने जगण्याची संस्कृती असून त्यामुळे कोल्हापुरातील पेटा मोठे मताधिक्य देतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. शाहू महाराजांनी सांगितले की या सभेसाठी झालेली गर्दी लाटकरांची लाट आहे. त्यांचे प्रेशर विरोधी उमेदवारांना आलं असल्याचे ते म्हणाले. 


यावेळी शिवसेनेचे संजय पवार, विजय देवणे, रविकिरण इंगवले, सुनिल मोदी, काँग्रेसचे सचिन चव्हाण, राष्ट्रवादीचे आर. के. पवार, कॉ. दिलीप पवार, कॉ. सतिशचंद्र कांबळे, कॉ. अतुल दिघे, आपचे संदिप देसाई, दौलत देसाई, बाबुराव कदम, शिवाजीराव परुळेकर, व्यंकाप्पा भोसले, बबन रानगे, सौ. सरलाताई पाटील, डी. जी. भास्कर, टी. एस. पाटील, सौ. प्रज्ञाताई उत्तुरे, पद्मजा तिवले, श्रीमती भारतीताई पोवार, बाबासो देवकर, अँड. बाबा इंदुलकर,सर्व माजी नगरसेवक, महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रचंड जनसमुदाय उपस्थित होता.


इतर महत्वाच्या बातम्या