Astrology Panchang 09 November 2024 : आज 9 नोव्हेंबरचा शनिवारचा दिवस. तसेच आज दुर्गाष्टमीही साजरी केली जाणार आहे. त्यामुळे आजचा दिवस खास आहे. तसेच, आज वृद्धी योग (Yog), सर्वार्थ सिद्धी योग आणि श्रवण नक्षत्राचा शुभ संयोग जुळून आला आहे. त्यामुळे आजच्या दिवसाचं महत्त्व फार वाढलं आहे. वैदिक ज्योतिष शास्त्रानुसार, आज जुळून आलेल्या शुभ योगाचा लाभ 5 राशीच्या लोकांना होणार आहे. या राशी (Zodiac Signs) नेमक्या कोणत्या ते जाणून घेऊयात.
मिथुन रास (Gemini Horoscope)
मिथुन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. आज तुम्ही तुमच्या वाणीने आणि स्वभावाने इतरांना प्रभावित कराल. तसेच, तुमच्या चतुराईने तुम्ही इतरांकडून तुमचं काम काढून घेऊ शकता. आज तुमचं अनेक दिवसांपासून रखडलेलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. तसेच, कोणाकडून पैसे उधारी घेतले असतील तर ते लवकरात लवकर परत करण्याचा प्रयत्न करा.
सिंह रास (Leo Horoscope)
सिंह राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सुखकारक असणार आहे. तुम्हाला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर तुमचं कुटुंब आणि मित्रांची साथ मिळेल. धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन तुम्ही करु शकता. तसेच, तुमच्यासमोर उत्पन्नाचे नवे मार्ग खुले होतील. तुम्हाला जर नवीन व्यवसाय सुरु करायचा असेल तर त्यासाठी हा काळ चांगला आहे. तुम्हाला मित्रांची देखील चांगली साथ मिळेल.
धनु रास (Sagittarius Horoscope)
धनु राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास असणार आहे. आज तुम्ही तुमच्या कुटुंबियांबरोबर शुभ कार्याला भेट देऊ शकता. तसेच, प्रत्येक क्षेत्रात जबाबदारीने काम करण्यास तुम्ही सक्षम असाल. जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर आजच्या दिवसात तुम्हाला चांगला लाभ मिळू शकतो. तुमच्या व्यवसायाचा अधिक मोठ्याने विस्तार होईल. तसेच, उत्पन्नाचे नवे मार्ग तुमच्यासमोर मोकळे होतील.
कुंभ रास (Aquarius Horoscope)
कुंभ राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. जर तुम्ही आज एखाद्या नवीन कार्याची सुरुवात करणार असाल तर त्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. तुम्हाला ज्येष्ठांचं चांगलं मार्गदर्शन मिळेल. तसेच, नोकरी-व्यवसायात नेतृत्व करण्याची तुम्हाला चांगली संधी मिळेल. तसेच, कुटुंबात अनेक दिवसांपासून वाद सुरु असतील तर ते लगेच संपतील.
मीन रास (Pisces Horoscope)
मीन राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस लाभदायक असणार आहे. तुम्हाला आज तुमच्या मनाप्रमाणे जगता येईल. तुमच्यावर कोणाचा लोड नसणार आहे. त्यामुळे तुम्ही निश्चिंत राहा. तसेच, तुमच्या कुटुंबात आज धार्मिक वातावरण पाहायला मिळेल. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. लवकरच तुम्ही यात्रेला जाण्याचा देखील चांगला योग आहे.
(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)
हेही वाचा :