कोल्हापूर : जयश्रीताई यांना निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होतं, चंद्रकांत जाधव यांना सुद्धा निवडून आणण्यासाठी जीवाचं रान केलं होतं. जयश्रीताई यांनी किमान जाताना किंवा काही अडचण असल्यास माझ्याशी बोलायला हवं होतं. आता जे कृत्य त्यांनी केलं आहे ते जाधव कुटुंबाला शोभणार नाही. त्यांनी घेतलेला निर्णय क्लेषदायी असल्याची खंत काँग्रेस जिल्हाध्यक्ष तथा आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली. कोल्हापूर उत्तरमध्ये काँग्रेसचाच उमेदवार निवडून येणार असल्याचा विश्वास देखील पाटील यांनी व्यक्त केला.
जिंकण्याची खात्री नसल्याने हा प्रवेश प्रवेश करून घेतला
आज काँग्रेस आमदार जयश्री जाधव यांनी कोल्हापूर उत्तरमधून उमेदवारी न मिळाल्याने शिंदे गटांमध्ये प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत जयश्री जाधव यांनी मुंबईमध्ये शिंदे गटामध्ये प्रवेश केला. त्यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी निवड निवड करण्यात आली आहे. दरम्यान, जयश्री जाधव यांनी काँग्रेस सोडल्यानंतर सतेज पाटील यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, जी फोडाफोडी सत्ता स्थापन करताना झाली होती तीच फोडाफोडी कोल्हापूरमध्ये झाली आहे. जयश्री जाधव यांना पक्षात घेतलं आहे. या पक्षप्रवेशासाठी मुंबईला घेऊन गेले. त्यांना जिंकण्याची खात्री नसल्याने हा प्रवेश प्रवेश करून घेतला असल्याचा टोला पाटील यांनी लगावला. ते म्हणाले की, खासगी विमानाने त्यांना कोल्हापुरातून मुंबईमध्ये नेण्यात आलं. त्यांच्यावर दबाव होता की आणखी काय होतं हे जयश्री जाधव सांगू शकतील. मात्र, कोल्हापूर जिल्ह्याती जनता हे सहन करणार नसल्याचे ते म्हणाले.
आम्ही फोडाफोडी करणार नाही, मात्र आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार
उमेदवारीबाबत त्यांच्याशी बोललो होतो. त्या नाराज नव्हता असेही सतेज पाटील यांनी सांगितले. मात्र कोणता दबाव त्यांच्यावर होतात हे त्याच सांगतील असंही त्यांनी यावेळी सांगितले. पाटील यांनी जयश्री जाधव यांच्या उमेदवारी संदर्भात बोलताना सांगितले की त्यांनी उमेदवारी मागितली होती. त्यांची देखील निवडणूक लढवण्याची इच्छा होती. मात्र, वस्तुस्थिती समजावून सांगितल्यानंतर त्यांनी मान्य केलं होतं. आम्ही फोडाफोडी करणार नाही मात्र आम्ही करेक्ट कार्यक्रम करणार असल्याचे ते म्हणाले. क्षीरसागर यांना स्वतःच्या ताकतीवर निवडून येण्याचा विश्वास नव्हता. त्यामुळे त्यांनी फोडाफोडीचं राजकारण सुरू केलं असल्याचं ते म्हणाले. अशा पद्धतीने फोडाफोडी करून कोणी कोंडीत पकडू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. जयश्री जाधव यांच्या पक्ष प्रवेशाने आमचा विजयआणखी सुखर झाला असल्याचे ते म्हणाले.
इतर महत्वाच्या बातम्या