Satej Patil : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात आता चांगलाच रंग भरला आहे. महायुतीच्या नेत्यांकडून काँग्रेस नेते सतेज पाटील यांना लक्ष केलं जात असताना आता सतेज पाटील यांनी आपल्या स्टाईलने महायुतीला प्रतिउत्तर दिलं आहे. बंटी पाटील हा कच्चा पैलवान नाही. एकदा का मैदानात उतरलं तर मैदान मारल्याशिवाय आम्ही परतत नाही असं काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी म्हटलं आहे. 

Continues below advertisement

महायुतीचे नेते काँग्रेसला उमेदवार मिळणार नाही असा अपप्रचार करत होते असे देखील सतेज पाटील म्हणालेत. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत नुकतीच प्रचार सभा पार पडली, या प्रचार सभेवेळी सतेज पाटील यांनी हे वक्तव्य केलं आहे.

कोल्हापूर महापालिकेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत सामना

कोल्हापूर महापालिकेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडीतील एकमेकांच्या विरोधात लढत आहे. 15 जानेवारीला मतदान आणि 16 जानेवारीला निकाल जाहीर होणार आहे. मागील सभागृहातील 26 तर एकूण महापालिकेच्या सभागृहात गेलेले 53 माजी नगरसेवक या निवडणुकीच्या मैदानात शड्डू ठोकला आहे. कोल्हापूर महापालिकेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होत आहे. विकासकामे आणि कोल्हापूरकारांसाठी काय करणार याचा प्रचार करत असताना महायुतीच्या टार्गेट बंटी उर्फ सतेज पाटील असल्याचे प्रचारसभांमधून पाहण्यास मिळत आहे. महायुतील भाजप, शिवसेनेतील नेत्यांसह आणि आम आदमी पक्षाचे नेते देखील सतेज पाटलांवर तुटून पडल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. 

Continues below advertisement

विधानसभेप्रमाणेच आता महापालिकेतही जनता घंटी वाजवून आपला कौल देईल, शिवसेनेची सतेज पाटलांवर टीका

कोल्हापूर महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले असून शिवसेना (शिंदे गट) आमदार राजेश क्षीरसागर यांनी काँग्रेसचे नेते सतेज पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. केवळ घोषणा केल्या जात आहेत, असा आरोप सतेज पाटील करत असतील तर प्रत्यक्ष सुरू असलेली कामे कंत्राटदार पैसे मिळण्याआधी करतील का, असा थेट सवाल क्षीरसागर यांनी उपस्थित केला आहे. “विकासकामे ही कागदावरची नसून प्रत्यक्षात सुरु आहेत. त्यामुळे चुकीच्या नेरिटीव्हवर पुन्हा एकदा जनता फसणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. विधानसभेप्रमाणेच आता महापालिकेतही कोल्हापूरकर जनता घंटी वाजवून आपला कौल देईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

महत्वाच्या बातम्या:

Giriraj Sawant Pune Municipal Corporation Election 2026: तानाजी सावंताच्या मुलासाठी मराठा समाज एकवटला; गिरीराज सावंत पुण्यातील प्रभाग क्रमांक 37 मधून शिवसेनेचे उमेदवार