Saoner Vidhan Sabha Constituency : संपूर्ण राज्यासह देशाला आतुरता लागून राहिलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 (Maharashtra Assembly Election 2024)ची रणधुमाळीला आता अवघ्या काही तासांचा अवधी शिल्लक राहिला आहे. येत्या 20 नोव्हेंबर 2024 रोजी विधानसभेच्या निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. तर 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणीनंतर मतदारांचा अंतिम कौल सर्वापुढे असणार आहे. दरम्यान, आगामी विधानसभा निवडणुकांच्या (Maharashtra Election 2024) अनुषंगाने राजकीय हालचालींना प्रचंड वेग आले असून सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभेसाठी जंगी प्रचार केला जात आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि महायुतीत (Mahayuti) यंदा मुख्य लढत होणार असून इतर अनेक पक्षदेखील यंदा निर्णायक ठरतील असे सध्याचे चित्र आहे.


 सावनेर मतदारसंघात कुणाची हवा? 


अशातच राज्याच्या राजकारणात महत्वाचा समजला जाणाऱ्या नागपूरातील 12 मतदारसंघासह सावनेर विधानसभा मतदारसंघात (Saoner Assembly Constituency) यंदा कोण बाजी मारणार हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे. कारण २०१४ मध्ये देशमुख काका-पुतण्याच्या लढाईने काटोलची निवडणूक राज्यभरात गाजली. आता भाजपचे डॉ. आशिष देशमुख, त्यांचे सख्खे भाऊ डॉ. अमोल देशमुख आणि काँग्रेस नेते सुनील केदार यांच्या पत्नी अनुजा यांच्या लढतीने सावनेर मतदारसंघाची (SaonerVidhan Sabha Election 2024) निवडणूक चर्चेत आहे. देशमुख भावंडे आपसात लढत असले तरी सावनेरमध्ये खरा मुकाबला हा भाजप विरुद्ध काँग्रेस, असा होताना दिसतो आहे.


लाडक्या वहिनीविरुद्ध लाडक्या बहिणींवर मदार


जिल्हा बँक घोटाळ्यात शिक्षा झाल्यानंतर सुनील केदार यांना यावेळी सावनेरमध्ये निवडणूक लढविण्यापासून वंचित राहावे लागले. त्यामुळे त्यांच्या पत्नी अनुजा यांना काँग्रेसने संधी दिली आहे. केदार यांच्या सावनेरमधील प्रस्थाला सुरुंग लावण्यासाठी भाजपने पुन्हा एकदा 'लाडका भाऊ' असलेले डॉ. आशिष देशमुख (Ashish Deshmukh) यांच्यावर विश्वास टाकला आहे. अनुजा या नागपूरच्या पहिल्या महिला महापौर कुंदाताई विजयकर यांच्या कन्या तर सहकार महर्षी बाबासाहेब केदार यांच्या सून आहे. आशिष आणि अमोल देशमुख हे काँग्रेसचे विदर्भातील दिग्गज नेते रणजित देशमुख यांचे चिंरजीव आहेत. सावनेर मतदारसंघ, केदार आणि देशमुख कुटुंब या मागे विविध राजकीय कंगोरेही आहेत. त्यामुळे यावेळी सावनेरची निवडणूक अधिक हायव्होल्टेज होत आहे. २००९ मध्ये आशिष देशमुख यांनी केदार यांना घाम फोडला होता. अवघ्या ३,४७२ मतांनी देशमुख यांचा पराभव झाला होता. यावेळी भाजपच्या मजबूत संघटेनसह पुन्हा एकदा देशमुख यांनी केदार यांना पहिल्याच दिवसांपासून कोंडीत पकडण्याची व्यूहरचना आखल्याने सावनेरचा मामला टफ झाला आहे. येथे १९ उमेदवार रिंगणात आहेत. यात 'बसपा'ने ताराबाई गौरकर, 'वंचित'ने अजय सहारे तर 'मनसे'ने धनश्याम निघाडे यांना संधी दिली आहे.


2019 मध्ये काय घडले?


सुनील केदार काँग्रेस - १,१३,१८४(विजयी)


डॉ. राजीव पोद्दार (भाजप) ८६,८९३