Santosh Bangar ON Devendra Fadanvis as CM: महाराष्ट्राच्या विधीमंडळ गटनेतेपदीपदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव एकमताने संमत झाल्याने मुख्यमंत्रीपदी आता देवेंद्र फडणवीसच बसणार असल्याचं जाहीर झालं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिक्कामोर्तब होताच महाराष्ट्रात जल्लोष साजरा केला जात आहे. दरम्यान एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेतील नेतेही महायुतीच्या या निर्णयाला पाठिंबा देताना दिसतायत.दरम्यान, फडणीसांना मुख्यमंत्री करावे लागणं हा ज्या त्या पक्षाचा विषय असतो आम्हाला असं वाटलं होतं की शिवसेनेचा मुख्यमंत्री एकनाथ भाई शिंदे व्हावा परंतु हे महायुतीचे सरकार आहे . असं संतोष बांगर म्हणाले आहेत. एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस अजित दादा वरिष्ठ नेते त्यांच्या पातळीवर हा निर्णय होत असतो. देवेंद्र फडणवीस यांचे जर नाव आले असेल तर तर त्यांचे स्वागतच आहे. असंही बांगर म्हणाले.
उद्या होणाऱ्या शपथविधीला आम्हाला बोलवण्यात आलेलं आहे. आम्ही सर्वजण, शिवसेनेची टीम त्या शपथविधीला जाणार आहे.जोपर्यंत वरिष्ठांचे आदेश येत नाहीत तोपर्यंत काहीही नसतं. ज्या दिवशी एकानाथ शिंदे यांचे आदेश येतील त्या दिवशी ते शपथ घेतील.असंही बांगर म्हणाले.
एकनाथ शिंदे नाराज? बांगर म्हणाले..
मुख्यमंत्रीपदावर भाजपचाच चेहरा असणार हे निश्चित झाल्यापासून एकनाथ शिंदे नाराज असल्याच्या चर्चा सुरु आहेत. दरे गावात जाण्यापासून ते तब्येत बिघडण्याच्या सर्व घटनाक्रमात ही चर्चा कायम होती. यावर संतोष बांगर म्हणाले,'एकनाथ शिंदे कधीच नाराज नसतात. महाराष्ट्राचा विकास हा त्यांचा एकच ध्यास असतो आणि महाराष्ट्राचा विकास तुम्ही पाहिला असेल. मागील अडीच वर्षात संपूर्ण महाराष्ट्राचा कायापालट करण्याचे काम कोणी केला असेल, ते एकनाथ शिंदे यांनी केलं आहे.महाराष्ट्रातील जनतेच्या मनात एकनाथ शिंदे यांचे स्थान आहे.शिवसेनेचे संपर्कप्रमुख आणि पदाधिकारी आणि मी आमदार म्हणून त्या शपथविधीला जाणार आहे. असंही ते म्हणाले.
विधीमंडळ पक्षाच्या बैठकीत फडणवीसांच्या नावावर शिक्कामोर्तब
ही बैठक संपल्यानंतर विधानसभवनातच भाजपाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक झाली. या बैठकीला भाजपाचे सर्व 132 आमदार उपस्थित होते. तसेच भाजपाला पाठिंबा देणाऱ्या अपक्ष आमदारांचाही या बैठकीत समावेश होता. भाजपाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपाच्या नेतेपदासाठी शिक्कामोर्तब झाल्यानंतर विधीमंडळ पक्षाच्या बैठकीतही देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव गटनेतेपदासाठी ठेवण्यात आला. या प्रस्तावाला सर्व आमदारांनी एकमताने अनुमोदन दिले.
हेही वाचा:
देवेंद्र फडणवी यांची भाजपाच्या गटनेतेपदी एकमुखाने निवड, दुपारी सत्तास्थापनेचा दावा करणार