मुंबई - राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीपदाचा शपथविधी सोहळ्याची आझाद मैदानावर जय्यत तयारी करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांच्यासह अन्य बड्या नेत्यांच्या उपस्थितीत आज संध्याकाळी 5.30 वाजता शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी विविध मान्यवरांना निमंत्रणं देण्यात आली असून त्यात राज्यातील प्रमुख नेत्यांचाही समावेश आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री यासह प्रमुख नेते या सोहळ्याला उपस्थित राहतील. या सोहळ्याचं निमंत्रण शरद पवार, उद्धव ठाकरे, राज ठाकरे यांनाही देण्यात आले आहे. त्यामुळे ते सोहळ्याला उपस्थित राहणार का याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान या शपथविधी सोहळ्याबाबत बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी देवेंद्र फडणवीसांना (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री पदासाठी शुभेच्छा दिल्या आहेत, तर बहुमत असताना देखील 12 ते 13 दिवस शपथविधी नाही, आज अखेर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) शपथ घेत आहेत, राज्याची लूट होऊ नये, अशी जबाबदारी त्यांच्यावर आहे असं म्हटलं आहे.
ईव्हीएम च्या माध्यमातून किंवा लोकशाही मार्गाने राज्यात सरकार स्थापन झालेला आहे बहुमत असतानाही बारा ते तेरा दिवस मुख्यमंत्री शपथ घेऊ शकले नाहीत अंतर्गत रस्ते फुगवे जनतेने पाहिले आणि अखेर आज मैदानावर राज्याच्या मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस शपथ घेणार आहेत. महाराष्ट्राच्या परंपरेने आम्ही त्यांना शुभेच्छा देतो यापुढे आपण जोपर्यंत त्या पदावर आहात तोपर्यंत हे महान राज्य महाराष्ट्र आहे हे राज्य काळजीपूर्वक सांभाळण्याचा आणि त्याची लूट न होण्याची जबाबदारी ही तुमच्यावर आहे असं ते म्हणाल्यात. गेल्या काही वर्षात महाराष्ट्राची झालेली लूट गेलेल्या उद्योग या सर्वांवर दरोडे पडले घरी थांबून महाराष्ट्राला पुन्हा एकदा वैभवशाली वैभवशाली राज्य बनवण्याची जबाबदारी ही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांवर आहे तर नक्कीच महाराष्ट्र त्यांना एक चांगला मुख्यमंत्री म्हणून देईल.
उध्दव ठाकरे शपथविधाला जाणार?
या शपथविधीसाठी उद्धव ठाकरेंना देखील निमंत्रण देण्यात आलेले आहे. उद्धव ठाकरे शपथविधीला जाणार का? या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, मी दिल्लीत आहे. उद्धव ठाकरे मुंबईत आहेत. राज्यातील काही माजी मुख्यमंत्र्यांपैकी अनेक नेते त्यांच्याच पक्षात आहेत. त्यातील एक मुख्यमंत्री हे त्यांच्याच सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहेत. जी टीका देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत झाली होती, कमिशनरचा फौजदार झाला तसंच आता पार्ट टू आपल्याला आझाद मैदानावर पाहायला मिळणार आहे. प्रत्येकाची राजकीय मजबुरी असते. अशोक चव्हाण देखील त्याच पक्षांमध्ये आहेत. ज्याला जायचं आहे ते जातील. उद्धव ठाकरे जातील की नाही त्याबाबत मी कसं सांगणार मी दिल्लीत आहे, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
संजय राऊतांना निमंत्रण?
तुम्हालाही निमंत्रण आलं आहे का? या प्रश्नावर बोलताना संजय राऊत म्हणाले, राज्याच्या शिष्टाचारानुसार राज्यातील सर्व आमदारांनी खासदारांना आमंत्रण येतात, त्यानुसार आम्हालाही आलं असावं, राज्यातील आमदार खासदार यांना अशा प्रकारच्या कार्यक्रमाला बोलवण्याचे प्रथा परंपरा आहे. ती नव्या सरकारने तोडली नसावी अशी आमच्या आशा आहे. कारण दिल्लीतून आणि देशभरातून एवढे पाहुणे आणि एवढे नेते तिथे येतात. त्याच्यामुळे राज्यातील भूमिपुत्र आमदार, खासदार यांना जागा मिळते की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेवटी भूमिपुत्र हटाव अशी एक भूमिका महाराष्ट्रात भाजपने घेतली आहे, अनेक जण त्याचे बळी जाऊ शकतात, असं राऊत पुढे म्हणाले आहेत.
एकनाथ शिंदे शपथ घेणार?
एकनाथ शिंदे शपथ घेतील की नाही या प्रश्नावर संजय राऊत म्हणाले, ते शंभर टक्के शपथ घेतील. पण शपथ पाळण्याची हिंमत जी असते ती त्यांच्यात आहे का ती तपासावी लागेल. ते शंभर टक्के शपथ घेतील. दिल्लीची पंगा घेण्याची हिंमत या क्षणी त्यांच्यात नाही. कारण गेल्या अडीच तीन वर्षांमध्ये ती हिम्मत नव्हती, म्हणून त्यांनी पक्ष फोडला. आज जर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली तर उरलेल्या मंत्रिमंडळ सरकारमध्ये स्थापन करण्यासाठी त्यांना बराच काळ मिळतो आणि जे प्रमुख लोक आहेत तेच राज्य चालवत राहतील. अनेकांच्या नाराज्या ओढवून घ्याव्या लागतात, मंत्रिमंडळ विस्तारात काय होते बघूयात. आता महाराष्ट्राच्या नशिबात काय लिहिले ते आपल्याला पाहावे लागेल, काही लोक सत्तेशिवास राहू शकत नाहीत, असे संजय राऊत पुढे म्हणालेत.