Rahul Narwekar Threat in BMC Election: राहुल नार्वेकरांचा विषय हा अत्यंत गंभीर आहे. जरी त्यांनी काल मला उत्तर वगैरे दिलं म्हणता, पण ते काय मला उत्तर देणार? शिवसेनेतूनच त्यांचा प्रवास सुरू झाला हे आम्हाला माहिती आहे. विधानसभा अध्यक्षांन उमेदवारांना धमक्या दिल्या आहेत. 30 डिसेंबरचं चार वाजल्यानंतर सीसीटीव्ही फुटेज काढा, अशी मागणी आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज केली होती. त्यानंतर आता राहुल नार्वेकर यांनी धमकावलेला व्हिडिओच समोर आणला आहे. या व्हिडिओत राहुल नार्वेकर माजी खासदार हरिभाऊ राठोड यांची तातडीने सुरक्षा काढून घेण्यास मुंबई पोलिसांना सांगताना दिसून येत आहेत. त्यांनी जाँईंट सीपींना फोन लावून थेट सुरक्षा आताच्या आता काढा, हा विधानसभा अध्यक्षांचा आदेश आहे असे म्हणत असल्याचे दिसून येते.
काय आहे व्हिडिओत?
उमेदवारी माघारीवरून राहुल नार्वेकर धमकीच्या इशाऱ्यात बोलताना दिसून येत आहेत. जर तुम्हाला सहकार्य करायचं नसेल, तर सुरक्षा मिळणार नाही असे हरिभाऊ राठोड यांना उद्देशून बोलताना दिसून येत आहेत. यावेळी समोरून साहेब आम्ही आंदोलनकर्ते आहोत असे बोलताा दिसून येत आहे. दुसरीकडे, राहुल नार्वेकर यांच्या धमकीनंतर हरिभाऊ राठोड यांनी सुद्धा हल्लाबोल केला आहे. हरिभाऊ राठोड म्हणाले, राहुल नार्वेकर मला म्हणाले की माझे सगळे प्रिव्हीलेज मी काढून घेईन. मी म्हटले साहेब तुम्ही मला फाशीवर चढवू शकता. त्यावर ते म्हणाले की तुम्हाला माहित असून सुद्धा माझ्यासोबत का पंगा घेताय मग? हे सगळे मी रेकॉर्ड केले आहे. मी त्यांना म्हटले की मला माहीत आहे की तुम्हाला तुमच्या भावाला, बहिणीला आणि वाहिनीला उमेदवारी द्यायची आहे. यासाठी धमक्या देत आहेत. आमच्या बीएसपीच्या कार्यकर्त्यांना धमक्या दिल्या, त्यांना बाहेर काढले.
आणि अर्ज आमच्याविरोधात अर्ज भरता
हरिभाऊ राठोड यांनी सांगितले की, नार्वेकर मला बोलले तुम्ही मुख्यमंत्र्यांकडून कामं करुन घेता आणि अर्ज आमच्याविरोधात अर्ज भरता. नार्वेकर 5 वाजेपर्यंत इथे होते, येरझाऱ्या मारत होते. मला त्यांनी धमकी दिली, सिक्युरिटी कोणी दिली तुम्हाला?तुम्ही संवैधानिक पदावर आहात, तुम्हाला शोभत नाही असं मी बोललो. बिनविरोध करायचं आहे यासाठी आम्हाला धमक्या देत होते. राहुल नार्वेकर संविधानिक पदावर आहेत, तरी ते असे वागले.
काय आहे संपूर्ण प्रकण?
मुंबई महापालिकेच्या निवडणुकीसाठी 30 डिसेंबर हा अर्ज दाखल करण्याचा अंतिम दिवस होता. कुलाबा विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक 225, 226 आणि 227 मधून राहुल नार्वेकर यांचे नातेवाईक बंधू मकरंद नार्वेकर, बहीण गौरवी शिवलकर आणि वहिनी हर्षदा नार्वेकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. या अर्ज प्रक्रियेदरम्यान राहुल नार्वेकर स्वतः उपस्थित होते. याच उपस्थितीवरून वादाला तोंड फुटलं आहे. नार्वेकर यांच्या उपस्थितीमुळे दबावाचे वातावरण निर्माण झाले आणि काही उमेदवारांना अर्ज भरण्यापासून रोखण्यात आले, असा आरोप केला जात आहे.
इतर महत्वाच्या बातम्या