मुंबई : ईव्हीएम (EVM machine) संदर्भात आमच्याकडे जवळजवळ 450 तक्रारी आहेत. त्यावर वेळोवेळी आक्षेप घेऊन सुद्धा या तक्रारींची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे या निवडणुका सरळ मार्गाने झाल्या, असं आपण कसं काय म्हणू शकतो? म्हणून माझी परत मागणी आहे की, हा निकाल तसाच ठेवून पुन्हा एकदा बॅलेट पेपरवर निवडणूक घ्यावी, अशी मागणी करत शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी ईव्हीएमवर शंका व्यक्त करत टीका केली आहे.


ईव्हीएम संदर्भात आमच्याकडे साडेचारशे तक्रारी - संजय राऊत


ईव्हीएम संदर्भात उदाहरण द्यायचं झालं तर नाशिक मध्ये एक उमेदवार आहे ज्याच्या घरात 65 मत असताना त्याला केवळ चार मतं पडली. डोंबिवलीत आमच्या कार्यकर्त्यांना असे आढळून आले की तिथे ईव्हीएम मशीनचे  आकडे मॅच होत नाहीत, आणि त्यावर आक्षेप घेतला तर निवडणूक आयोगचे अधिकारी तो आक्षेप मानायला तयार नाही. असे अनेक उदाहरणं पुढे आले आहेत. त्यांचे पुरावे ही पुढे आले आहेत. ज्यांनी कुठले असे क्रांतिकारी कार्य केले ज्यांना दीड दीड लाख मते मिळाली? काल पक्षात गेलेले लोक आमदार झाले, असा काय पराक्रम यांनी केला, जे यांना यश आलं. म्हणून कुठेतरी शंकेला जागा आहे.  प्रथमच शरद पवार सारख्या ज्येष्ठ नेत्याने ईव्हीएम वर संशय घेतली आहे. असेही खासदार संजय राऊत यांनी  शंका व्यक्त करत टीका केली


दीड लाख मतं मिळवण्यामागे काय कर्तुत्व?- संजय राऊत


राज्यात महाविकास आघाडीला अपयश आलं असलं तरी या पराभवाचं खापर कुण्या एका व्यक्तीवर फोडता येणार नाही. आम्ही सर्व महाविकास आघाडी म्हणून लढलो. जेव्हा शरद पवार यांच्या सारखा नेता, ज्यांच्या मागे महाराष्ट्र उभा असल्याचे चित्र दिसलं, त्यांना देखील अपयश आलंय. त्यामुळे या अपयशाचे कारण शोधले पाहिजे. त्यातील एक कारण ईव्हीएम मशीनमध्ये आहेत, यंत्रणेच्या गैरवापरांमध्ये आहे, घटनाबाह्य खुर्च्यांमध्ये आहे. तसेच ते न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी न घेतलेल्या निर्णयांमध्ये देखील आहे. त्यातलं मुख्य कारण शोधलं पाहिजे. राज्यात आम्ही महाविकास आघाडी म्हणुन लढलो काही ठिकाणी आमचे मतभेद झाले असेल, मात्र हे अपयश संपूर्ण मविआचे आहे. एका पक्षाचे आहे हे आम्ही कधीही मानणार नाही. आमचे विरोधक ज्या पद्धतीने  निवडणूक लढवत होते त्याला मी फेअर निवडणूक मानणार नाही. राज्यात अनेक ठिकाणी ईव्हीएम संदर्भात ज्या बातम्या येत आहेत. नंबर  कसे जुळत नाही किंवा मतांचा आकडा जुळत नाही इत्यादी अनेक कारण आहेत.


हे ही वाचा