सांगोला : गेले 55 वर्षे सांगोला विधानसभा मतदारसंघातून आमदार असणाऱ्या भाई गणपतराव देशमुख यांच्या मुलाला डावलून शेकापने आज उद्योगपती भाऊसाहेब रुपनर यांना उमेदवारी घोषित केली आहे. आज सांगोला येथे पक्षाचे चिटणीस जयंत पाटील यांनी पाच उमेदवारांच्या मुलाखती घेतल्यावर रुपनर यांच्या नावाची घोषणा केली.
रुपनर यांचा फॅबटेक उद्योग समूह असून गणपतराव देशमुख यांचे ते अतिशय विश्वासू सहकारी म्हणून ओळखले जातात. आज मुलाखती दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये गणपतरावांचे पुत्र चंद्रकांत देशमुख यांचाही सहभाग होता. मात्र आजच्या मुलाखतीच्यावेळी गणपतराव देशमुख अनुपस्थित होते. शेकापच्या नेत्यांनी मुलाखती घेतल्यानंतर रुपनर यांच्या नावाची घोषणा केली.
सांगोला मतदारसंघातील सिंचनाचे बहुतांश प्रश्न गणपतराव देशमुख यानी अंतिम टप्प्यात आणले असून आता बेरोजगारीचा प्रश्न सोडवणार असल्याचे उमेदवार भाऊसाहेब रुपनर यांनी एबीपी माझाशी बोलताना सांगितले. 55 वर्षानंतर आता मतदारांना नवीन उमेदवाराला मतदान करायचे आहे, असे सांगत रुपनर यांच्या नावाची घोषणा झाली आहे. तरी मुलाखत दिलेले इतर उमेदवारही सक्षम असल्याचे गणपतराव देशमुख यांनी सांगितले . मी निवडणूक रिंगणात नसलो तरी शेकापचा उमेदवार निवडून आणणार असून सांगोल्याची जागा कॉंग्रेस आघाडीतून शेकापकडेच असणार असल्याचेही गणपतराव देशमुख यांनी सांगितले.
माझं वय 93 वर्ष आहे. आता मी परिणामकारक दृष्ट्या काम करून शकणार नाही. मात्र निवडणूक लढवणार नाही याचा अर्थ राजकारण सोडणार नाही. इतक्या वर्षानंतर उमेदवार निवडताना अडचणी येतात. सगळे उमेदवार सारखेच असताना रुपनर यांना उमेदवारी मिळाली. रुपनर यांना आम्ही निश्चितपणे निवडून आणू. पक्षाने दिलेला निर्णय कार्यकर्त्यांना स्वीकारावा लागेल.
गणपतराव देशमुख यांच्या मुलाला डावलत 'शेकापचा गड' सांगोल्यामध्ये उद्योजकाला उमेदवारी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
29 Sep 2019 05:21 PM (IST)
आज मुलाखती दिलेल्या पदाधिकाऱ्यांमध्ये गणपतरावांचे पुत्र चंद्रकांत देशमुख यांचाही सहभाग होता. मात्र आजच्या मुलाखतीच्यावेळी गणपतराव देशमुख अनुपस्थित होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -