Sangli Election Result : राज्याचं लक्ष लागून असलेल्या सांगली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल येण्यास सुरुवात झाली आहे. 

Continues below advertisement

लोकसभा निवडणुकीमध्ये सांगली पॅटर्न राबवून अपक्ष उमेदवार विशाल पाटील यांना निवडून दिलेल्या सांगलीमध्ये यंदा चुरशीने निवडणूक झाल्याचं दिसून आलं. जत विधानसभा सोडल्यास इतर सात मतदारसंघात लोकसभेवेळी महाविकास आघाडीने बाजी मारली होती. 

सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघातील प्रमुख लढती  

क्रमांक विधानसभा मतदारसंघ महायुती उमदेवार महाविकास आघाडी वंचित/अपक्ष/इतर विजयी उमेदवार
1 सांगली विधानसभा  सुधीर गाडगीळ (भाजप) पृथ्वीराज पाटील (काँग्रेस) जयश्रीताई पाटील (अपक्ष)  
2 मिरज विधानसभा सुरेश खाडे तानाजी सातपुते विज्ञान माने (वंचित)  
3 तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा संजय काका पाटील (NCP- AP) रोहित पाटील (NCP-SP)    
4 खानापूर विधानसभा सुहास बाबर (शिवसेना-शिंदे) वैभव पाटील (NCP-SP) राजेंद्र अण्णा देशमुख (अपक्ष)  
5 पलूस कडेगाव विधानसभा संग्रामसिंह देशमुख (भाजप) डॉ. विश्वजीत कदम (काँग्रेस)    
6 शिराळा विधानसभा सत्यजित देशमुख (भाजप) मानसिंगराव नाईक (NCP-SP)    
7 इस्लामपूर विधानसभा  निशिकांत पाटील (NCP- AP) जयंत पाटील (NCP-SP)    
8 जत विधानसभा गोपीचंद पडळकर (भाजप) विक्रम सावंत (काँग्रेस) तमनगौडा रवी पाटील (अपक्ष)  

 

2019 सालच्या निवडणुकीत काय झालं होतं? 

सांगली जिल्ह्यामध्ये एकूण आठ आमदार असून 2019 च्या निवडणुकीनंतर भाजप 2, राष्ट्रवादी 3, काँग्रेस 2 आणि शिवसेना 1 असे आमदारांचे संख्याबळ होतं. यापैकी शिवसेना शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर यांचे निधन झाल्याने एक जागा रिक्त झाली होती. नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निकालाचा विचार करता जिल्ह्यातील 8 पैकी 7 ठिकाणी महाविकास आघाडीने बाजी मारली होती.