मुंबई : राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू रोहित पवार यांनी कर्जत-जामखेड मतदारसंघात भाजपाचे मंत्री राम शिंदे यांचा तब्बल 43,347 मतांनी पराभव केला. विजयानंतर रोहित पवार यांनी चक्क राम शिंदे यांची घरी जाऊन भेट घेतली आणि त्यांच्या आईंचे आशिर्वाद घेतले. रोहित पवार यांच्या या कृतीचे सर्वच स्थरातून चांगले कौतुक होत आहे.
विजयानंतर रोहित पवार यांनी सायंकाळी पालकमंत्री राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे अभिनंदन करत फेटा बांधून सत्कार केला. निवडणूक पार पडली असून मतदार संघातील विकासासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन काम करायचे, अशी विनंती रोहित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह राम शिंदे यांच्या कार्यकर्त्यांना केली.
गेल्या २५ वर्षापासून सत्ता असलेल्या कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये भाजपचा दारुण पराभव झाला आहे. शरद पवारांचे नातू आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रोहित पवार यांनी भाजपचे उमेदवार राम शिंदे यांचा पराभव करत दणदणीत विजय मिळवला आहे. रोहित पवार यांनी 43 हजार 347 मतांनी राम शिंदेंचा पराभव केला. त्यामुळे कर्जत-जामखेड मतदार संघामध्ये भाजपला मोठा धक्का बसला आहे.
रोहित पवार यांना 1 लाख 35 हजार 824 मतं मिळाली आहेत. तर राम शिंदे यांना 92 हजार 477 मतं मिळाली आहेत. रोहित पवारांच्या दणदणीत विजयानंतर कर्जत-जामखेड मतदारसंघात एकच जल्लोष करण्यात आला. गुलालाची उधळण करत रोहित पवार यांची मिरवणूक काढण्यात आली आहे.
विजयानंतर रोहित पवारांनी घेतली राम शिंदेची भेट आणि म्हणाले......
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
24 Oct 2019 10:52 PM (IST)
विजयानंतर रोहित पवार यांनी सायंकाळी पालकमंत्री राम शिंदे यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. यावेळी राम शिंदे यांनी रोहित पवार यांचे अभिनंदन करत फेटा बांधून सत्कार केला.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -