कोण आहेत रोहिणी खडसे?
रोहिणी खडसे या एकनाथ खडसे यांच्या द्वितीय कन्या आहेत. मोठ्या कन्या शारदा गृहिणी आहेत. तर रोहिणी खडसे सक्रिय समाजकार्यात सहभागी असतात. सध्या त्या जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोठली इथे वास्तव्यास आहेत. एकनाथ खडसेंच्या राजकीय वारसदार म्हणून ही त्यांच्याकडे पहिलं जातं.
मुंबई-पुण्यात शिक्षण
1 डिसेंबर 1982 रोजी जन्मलेल्या रोहिणी खडसे यांचं शिक्षण मुंबई आणि पुण्यात झालं आहे. 36 वर्षीय रोहिणी खडसे यांनी मुंबई विद्यापीठातून बीकॉम आणि एलएलबीचं शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर पुण्यातून एलएलएमपर्यंतच शिक्षण घेतलं आहे.
भूषवत असलेली पदं
1. अध्यक्षा जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक जळगाव, (16 मे 2015 पासून आजपर्यंत)
2. उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघ मुंबई (मार्च 2015 पासून आजपर्यंत)
3. अध्यक्षा आदिशक्ती मुक्ताई सहकारी सूतगिरणी मुक्ताईनगर (जुलै 2013 पासून आजपर्यंत)
4. उपाध्यक्षा संत मुक्ताई शुगर अँड एनर्जी लि, मुक्ताईनगर (ऑक्टोबर 2013 पासून आजपर्यंत)
5. अध्यक्षा मुक्ताईनगर तालुका एज्युकेशन सोसायटी (14 ऑगस्ट 2017 पासून आजपर्यंत)
6. सरचिटणीस भारतीय जनता पक्ष जळगाव जिल्हा (2016 पासून आजपर्यंत)
7. सदस्या नियामक मंडळ, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मुंबई (जानेवारी 2018 पासून आजपर्यंत)
8. अध्यक्षा अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा जळगाव (9 एप्रिल 2015 पासून आजपर्यंत)
9. अध्यक्षा संवेदना फाउंडेशन मुक्ताईनगर (फेब्रुवारी 2015 पासून आजपर्यंत)
मिळालेले पुरस्कार
1. जाणीव सांस्कृतिक अभियान नाशिकतर्फे "राज्यस्तरीय जाणीव पुरस्कार 2015"
2. तरुण भारत जळगावतर्फे "खान्देशरत्न पुरस्कार 2015"
3. त्रिमूर्ती फाऊंडेशन आणि त्रिमूर्ती शिक्षण संस्था जळगावतर्फे "त्रिमूर्ती सन्मान 2015"
4. आपले परिवार सार्वजनिक वाचनालय भुसावळतर्फे उत्कृष्ट सामाजिक कार्यासाठी "समाजरत्न पुरस्कार 2015"
5. स्वयंभू प्रतिष्ठान व महिला मंडळ चाळीसगावतर्फे "मुक्तांगण पुरस्कार 2016"
6. राजमाता जिजाऊ महिला मंडळ पारोळातर्फे "कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2017"
7. शिवचरण फाउंडेशन मुक्ताईनगरतर्फे "कर्तृत्ववान महिला पुरस्कार 2017"
8. ग्लोबल लेवा फाउंडेशन जळगावतर्फे "लेवा आयकॉन्स पुरस्कार 2019"