मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने हिंदी सिनेमा आणि राजकारणाचं नातं उलगडण्याचा हा प्रयत्न आहे. हिंदी सिनेमा आणि राजकारण यांचा विचार केल्यास सुचित्रा सेन आणि संजीवकुमार यांच्या 'आँधी' चित्रपटाचा उल्लेख होतोच. याशिवाय अमिताभ बच्चन यांचा इन्कलाब, नमक हराम हेही चित्रपट येतात.

VIDEO | निवडणुकीचे रंग...सिनेमातले ढंग... | फ्लॅशबॅक | एबीपी माझा



'महंगाई मार गयी' सारखं महागाईच्या ज्वलंत प्रश्नावर भाष्य करणारं गाणंदेखील यामध्ये आहे. याशिवाय मराठीतला विचार केल्यास सामना, सिंहासन, सरकारनामा आणि वजीर या चित्रपटांचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. यामध्ये निवडलेली गाणीदेखील नेहमीसारखी फिल्मी गाणी नाहीत तर, त्याला राजकीय, सामाजिक आशय आहे.