Continues below advertisement

पुणे : पुणे महापालिकेची तिजोरी लुटली जात आहे, पुणेकरांचे पैसे डान्सबारमध्ये उडवले जात असल्याचा आरोप माजी आमदार आणि शिवसेना नेते रवींद्र धंगेकरांनी (Ravindra Dhangekar ) केला. रवींद्र धंगेकरांनी पुण्यातील भाजप नेत्याचा एक डान्सबारमधील व्हिडीओ शेअर केला. कोणत्याही परिस्थितीत पुण्याचा डान्सबार होऊ देणार नाही असं रवींद्र धंगेकरांनी म्हटलं.

महापालिकेच्या मतदानाच्या पार्श्वभूमीवर रवींद्र धंगेकरांनी भाजपचे केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आणि मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली. गणेश बिडकरमुळे पुण्यातील पाच पोलीस निलंबित झाले, त्यांचे संसार उघड्यावर आल्याचं धंगेकर म्हणाले.

Continues below advertisement

Ravindra Dhangekar Vs Murlidhar Mohol : मोहोळांनी खुलासा करावा

रवींद्र धंगेकर म्हणाले की, पुण्याच्या तिजोरीची लूट केली जात आहे, पैसे डान्सबारमध्ये उडवले जात आहेत. त्याचे अनेक व्हिडीओ आपल्याकडे आहेत. अशा डान्सबारवाल्यांना उमेदवारी देणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांनी त्यावर खुलासा करावा.

माणसामधील विकृती समोर आणली पाहिजे, लोकांनीही त्याना बाजूला ठेवलं पाहिजे असं रवींद्र धंगेकर म्हणाले. यावेळी त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्यावरही टीका केली.

Ravindra Dhangekar On Ajit Pawar : अजितदादा जे बोलतात ते करतात

अजित पवार यांच्यावर बोलताना धंगेकर म्हणाले की, "अजितदादा हे आमच्या कुटुंबातील विषय आहे. अजितदादा जे बोलतात ते करतात. त्यांच्या ओठावर एक आणि पोटात एक असं कधी नसतं. अजितदादांनी कधीही कुणाला देशोधडीला लावलं नाही, कुणाचे संसार उद्ध्वस्त केले नाहीत."

Ravindra Dhangekar On BJP : चारित्र्यहीन लोकांसाठी भाजपचं आरक्षण

चारित्र्यहीन लोकांसाठी भाजपनं वेगळं आरक्षण ठेवलंय असं म्हणत शिवसेनेच्या रवींद्र धंगेकरांनी भाजपवर हल्लाबोल केला. पुण्यातील प्रभाग 12 मधील भाजप उमेदवाराच्या पतीचा व्हिडीओ त्यांनी उघड केला. भाजप उमेदवाराचा पती डान्सबारमध्ये पैसे उडवताना चित्रीत झाला. संबंधित व्यक्ती शिवाजीनगरच्या आमदारांचे आर्थिक विषय सांभाळतो असा आरोप धंगेकरांनी केला. आर्थिक विषयातून कमावलेल्या पैशांत बारबालांसाठी कोटा आरक्षित असल्याचा आरोपही धंगेकरांनी केला. तर संस्कृतीच्या गप्पा मारणाऱ्या मोहोळ, चंद्रकांत पाटलांनी यावर खुलासा करावा असं आव्हान धंगेकरांनी केलं.

महापालिकेच्या निवडणूक प्रचाराच्या दरम्यान शिवसेना नेते रवींद्र धंगेकर आणि भाजपचे नेते मुरलीधर मोहोळ यांच्यामध्ये मोठं शाब्दिक युद्ध झाल्याचं पाहायला मिळालं.

ही बातमी वाचा: