मुंबई : राज्यसभा निवडणुकीच्या सहा जागांसाठी महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये मोठ्या प्रमाणात रस्सीखेच सुरु आहे. उद्या (3 जून) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटचा दिवस आहे. त्यामुळे जर एका उमेदवाराने माघार घेतली नाही तर अटीतटीची ही लढत होणार आहे. काय असणार आहे पक्षीय बलाबल जाणून घेऊया...


भाजपला पाठिंबा देणारे चार अपक्ष आमदार


1) प्रकाश आव्हाडे- इचलकरंजी 
2) राजेंद्र राऊत- बार्शी 
3) महेश बालदी- उरण 
4) रवी राणा- बडनेरा 


महाविकास आघाडीला पाठिंबा देणारे नऊ अपक्ष आमदार


1) श्यामसुंदर शिंदे- लोहा
2) किशोर जोरगेवार- चंद्रपूर
3) गीता जैन- मीरा भाईंदर  
4) नरेंद्र भोंडेकर- भंडारा
5) आशिष जयस्वाल- रामटेक
6) संजय शिंदे- करमाळा
7) चंद्रकांत पाटील- मुक्ताईनगर
8) मंजुषा गावित- साक्री.
9) विनोद अग्रवाल- गोंदिया 


......................


महाराष्ट्र विधानसभा पक्षीय बलाबल


सत्ताधारी महाविकास आघाडीचं संख्याबळ


शिवसेना - 55
राष्ट्रवादी - 53 
काँग्रेस - 44
बहुजन विकास आघाडी - 3 
समाजवादी पार्टी - 2
प्रहार जनशक्ती पार्टी - 2 
माकप - 1
शेकाप - 1 
स्वाभिमानी पक्ष - 1 
क्रांतिकारी शेतकरी पार्टी - 1 
अपक्ष - 9


सत्ताधाऱ्यांकडे एकूण संख्याबळ - 172


......................


विरोधी पक्ष भाजपकडील संख्याबळ 


भाजप - 106
जनसुराज्य शक्ती - 1 
राष्ट्रीय समाज पक्ष - 1 
अपक्ष - 4


विरोधाकडे असलेले एकूण संख्याबळ - 112


......................


भूमिका उघड न केलेले पक्ष  


एमआयएम - 2
मनसे - 1


एकूण तटस्थ - 3


मुंबईतील अंधेरी पूर्वचे शिवसेनेचे आमदार रमेश लटके यांचे नुकतेच निधन झाल्याने विधानसभेतील आमदारांची संख्या 287 अशी आहे.


रासपकडून रत्नाकर गुट्टे नेमकं कोणाला मदत करणार यात संदिग्धता आहे. कारण महादेव जानकर भाजपसोबत असले तरी भाजपकडून गोपीचंद पडळकर यांना दिलेल्या ताकदीवरुन महादेव जानकर नाराज आहेत. त्यामुळे हीच नाराजी या निवडणुकीत दिसण्याची शक्यता आहे.


अशी आहे मतदान प्रक्रिया
एका उमेदवाराला विजयासाठी किती आमदारांच्या मतांची आवश्यकता आहे हे राज्यसभेच्या किती जागांवर निवडणूक होत आहे यावर निश्चित केले जाते. यासाठी जो फॉर्म्युला असतो तो असा असतो की राज्यातील एकूण आमदारांच्या संख्येला राज्यसभेच्या होणाऱ्या निवडणुकीच्या आकड्याला 1 जोडून भागले जाते. यामध्ये पहिल्या नंबरने जो आकडा येतो त्याला तेवढी मते मिळवावी लागतात. महाराष्ट्रात एकूण आमदारांची संख्या 288 आहे. राज्यात 6 जागांवर निवडणूक होत आहे, तर फॉर्म्युला असा असेल 288/ [6+1] +1 = 42 म्हणजेच पहिल्या पसंतीची 42 मते मिळवावी लागतील.  


महाराष्ट्रात कोणाला फायदा होणार?
महाराष्ट्रात राज्यसभेच्या 6 जागांसाठी 10 जूनला मतदान होत आहे. राज्यात एकूण 288 विधानसभा सदस्य आहेत. अशा परिस्थितीत फॉर्म्युलानुसार 288/6+1+1 = 42 म्हणजेच एक राज्यसभा उमेदवाराला 42 मते मिळवावी लागतील. भाजपच्या गोटातून दोन उमेदवार विजयी होतील एवढे संख्याबळ आहे. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडे आपापल्या एक-एक उमेदवाराला विजयी करू शकतात. मात्र, आघाडी असल्याने ते आणखी एक उमेदवार पाठवू शकतात. त्यामुळे शिवसेनेकडून दुसरा उमेदवार रिंगणात आहे. राष्ट्रवादीने त्याला ग्रीन सिग्नल दिला आहे.