Rajasthan Election Result 2023 Live Update : राजस्थानमध्ये भाजपचे सरकार, अशोक गेहलोतांनी राज्यपालांकडे सोपावला राजीनामा

Rajasthan Assembly Election Results 2023:  राजस्थानमध्ये भाजपने सत्ता काबिज केली असून काँग्रेसला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं आहे.

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Dec 2023 11:21 PM

पार्श्वभूमी

मुंबई : राजस्थानमध्ये विधानसभेच्या 200 जागांपैकी 199 जागांसाठी मतदान प्रक्रिया पार पडली. 25 नोव्हेंबर रोजी राजस्थानमध्ये मतदान करण्यात आले. त्यामुळे आता संपूर्ण जनेतसह राजकारणी देखील 3 डिसेंबरची वाट पाहत आहे....More

Rajasthan Election Result Live :  हा पंतप्रधान मोदींच्या सुशासनाचा विजय, अर्जुन राम मेघवाल यांची प्रतिक्रिया 

राजस्थानसह तीन राज्यांतील भाजपच्या विजयाबाबत केंद्रीय मंत्री अर्जुन राम मेघवाल म्हणाले, "तीन राज्यात स्पष्टपणे भाजपचे सरकार स्थापन झाले आहे. आम्ही तेलंगणातही प्रगती केली आहे. आमचे दोन खांब म्हणजे विकास आणि सुशासन आणि पंतप्रधान मोदींचे उत्कृष्ट नेतृत्व. सुशासन आणि विकासामुळे आम्हाला हा विजय मिळाला आहे.