Amit Thackeray Mahim Vidhan Sabha Election 2024: मुंबईतील माहीम विधानसभा मतदारसंघात तिरंगी लढत होणार आहे. मनसेकडून अमित ठाकरे (Amit Thackeray), शिवसेना शिंदे गटाकडून सदा सरवणकर (Sada Sarvankar) आणि शिवसेना ठाकरे गटाकडून महेश सावंत (Mahesh Sawant) यांना उमेदवारी देण्यात आली आहे. महेश सावंत, सदा सरवणकर आणि अमित ठाकरेंकडून सध्या जोरदार प्रचार सुरु आहे. याचदरम्यान अमित ठाकरेंनी वडील (राज ठाकरे) यांचा 2006 मधील एक किस्सा सांगितला आहे.


लोकशाही या मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये ठाकरे बंधू एकत्र आले, तर महाराष्ट्राच्या राजकारणात फरक पडू शकतो का?,असा सवाल अमित ठाकरे यांना विचारण्यात आला. यावर 2006 मध्ये मी शाळेत होतो. यावेळी शिवसेना पक्ष वैगरे मला माहिती नव्हत. पण आजोबा, उद्धव काका हे नातं मला माहिती होतं. एकदिवशी मी घरातून (कृष्णकुंजवरुन) खाली उतरलो आणि बाबा (राज ठाकरे) त्यांच्या गाडीतून बाहेर उतरले. त्यावेळी मी पहिल्यांदा त्यांच्या डोळ्यात पाणी बघितलं. त्यावेळी राज ठाकरे शिवसेना सोडणार होते, असं अमित ठाकरे यांनी सांगितले. त्यानंतर माझ्या कानावर अनेक गोष्टी येत होत्या. काहीतरी घडतंय असं मला समजलं. त्यानंतर राज ठाकरेंनी महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष काढला, असं अमित ठाकरे म्हणाले. 


...तर राज ठाकरेंनी तुम्हाला नक्की पाठिंबा दिला असता- अमित ठाकरे


मी आजारी असताना 2017 मनसेचे सहा नगरसेवक उद्धव ठाकरेंनी पैसे देऊन चोरले, ही कुठेतरी भयानक होतं. हे मला पटलं नाही. तुम्ही विचारलं असतं तर राज ठाकरेंनी तु्म्हाला नक्की पाठिंबा दिला असता. मात्र तुम्ही ते केलं नाही, अशी खंत अमित ठाकरेंनी बोलावून दाखवली. तसेच आताही मी माहीममध्ये निवडणुकीसाठी उभा राहिल्यानंतर उमेदवार दिला. दादारमधील दीपोत्सवाबाबत तक्रार केली, असं अमित ठाकरेंनी सांगितले. 


राज ठाकरेंची भावनिक साद- 


मराठी माणसावर जो अन्याय होत होता, तो त्यात आला. त्यात होत वाचा आणि थंड बसा मात्र नंतर आले की वाचा आणि पेटून उठा...1985 साली बाळासाहेबांनी व्यंगचित्र करणे बंद केले ,त्यानंतर माझ्यावर जबाबदारी आली. लोकसत्ता, सामनामध्ये देखील माझे व्यंगचित्र चालू झाली. हे सगळे सांगायचं विचार का आला तर याची सुरुवात प्रबोधनकार ठाकरे, बाळासाहेब ठाकरे, श्रीकांत ठाकरे यांनी केली. शिवसेनेची स्थापना दादरमध्ये झाली , अनेक आमदार झाले. पण यंदा जे आधी घडले नाही ते आता घडतंय, आज दादर माहीम मतदारसंघात पहिल्यांदा एक ठाकरे उभा राहतोय, अशी भावनिक साद मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घातली.


संबंधित बातमी:


Devendra Fadnavis: महायुतीने अमित ठाकरेंना पाठिंबा का दिला नाही?; देवेंद्र फडणवीसांनी एका वाक्यात सांगून टाकले!