Raigad loksabha election Exit poll : रायगड लोकसभा मतदारसंघातील लढत ही अत्यंत तुल्यबळ समजली जातेय. या मतदारसंघातून पुन्हा एकदा सुनिल तटकरे आणि अनंत गीते आमने सामने आले होते. या निवडणुकीत शिवसेना ठाकरे गटाचे अनंत गीते (Anant Geete) हे आघाडीवर असल्याचा अंदाज टीव्ही 9 च्या एक्झिट पोलमध्ये वर्तवण्यात आलाय. तर सुनिल तटकरे  (sunil tatkare) हे पिछाडीवर असल्याचे दिसत आहे. हा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा हादरा असल्याचं बोललं जात आहे. 


टीव्ही 9 च्या एक्झिट पोलमध्ये महायुतीला धक्का


टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार मविआ 25 महायुतीला 22 जागा मिळणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार काही ठिकाणचे निकाल हे धक्कादायक लागणार असल्याचं सांगण्यात आलं आहे. दरम्यान, महायुतीला जरी फटका बसला असला तरी भाजप हा महाराष्ट्रात सर्वात मोठा पक्ष ठरणार आहे. भाजपला 18 जागा मिळणार असल्याचं अंदाज आहे. तर शिंदे गटाला 4 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गटाला राज्यात 14 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नसल्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला 5 जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शरद पवार गटाला 6 जागा मिळण्याचा अंदाज टीव्ही 9 च्या एक्झिट पोलनुसार वर्तवण्यात आला आहे. 


महायुती आणि मविआमध्ये जोरदार टक्कर


एबीपी माझा-सी वोटरच्या एक्झिट पोलमध्ये दिसली रस्सीखेच
महायुती व मविआला निम्म्या निम्म्या जागांचा अंदाज
महायुतीला 24 तर मविआला 23 जागांचा अंदाज


महायुतीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?


भाजप 17 जागा
शिंदे गटाला 6 जागा 
अजित पवार गट  1 जागा


महाविकास आघाडीमध्ये कोणत्या पक्षाला किती जागा मिळणार?


शिवसेना ठाकरे गट 9 जागा
काँग्रेस 8 जागा
शरद पवार गटाला 6 जागा 


महाराष्ट्रात महायुतीसह भाजपला मोठा तोटा शक्य
2019 ला 23 जागा जिंकणाऱ्या भाजपला यावेळी 17 च जागा शक्य
शिंदे गटाचा आकडाही 13 वरुन 6 पर्यंत घसरणार


रायगड लोकसभा मतदारसंघातील लढत ही तगडी मानली जातेय. या मतदारसंघात मागील वेळेस आमने सामने असलेले उमेदवारच यावेळी देखील निवडणूक लढवत आहेत. या मतदारसंघातील लढत ही अत्यंत प्रतिष्ठची मानली जातेय. या मतदारसंघात दिग्गज नेत्यांनी सभा घेतल्या होत्या. त्यामुळं सुनिल तटकरे आणि अनंत गीते या दोन्ही नेत्यांनी विजयाचा दावा केला आहे. 


महत्वाच्या बातम्या:


Lok Sabha Exit Poll 2024: महाराष्ट्रात धक्कादायक निकाल? मविआला 25, महायुतीला 22 अन् एका जागेवर अपक्ष उमेदवार जिंकण्याचा अंदाज