Yashomati Thakur comment on Dhananjay Munde : राज्यामध्ये शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत. खरीप हंगामाला सुरुवात झाली आहे. बियाणे, पाणीटंचाई काही भागात दुष्काळ असे प्रश्न समोर येत आहे. अशा स्थितीत राज्याचे कृषिमंत्री नव्हेतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बेजबाबदार पणाने वागत असल्याचे वक्तव्य काँग्रेस आमदार यशोमती ठाकूर (Yashomati thakur) यांनी केलं आहे.  कृषिमंत्री तर परदेश दौऱ्यावरती गेले आहेत. कृषिमंत्र्यांना हिरवी मिरची आणि लाल मिरची यातील फरक कळतो का नाही? याबद्दल शंका असल्याचे म्हणत आमदार यशोमती ठाकूर यांनी धनंजय मुंडेंना (Dhananjay Munde) टोला लगावला. 


महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीकडे मतदारांचा कल


अतिशय बेजबाबदार सरकार महाराष्ट्रमध्ये असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी यावेळी केली. महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीकडे कल असून देशात इंडिया आघाडीकडे मतदारांचा कौल असल्याचे ठाकूर यावेळी म्हणाल्या. 


राज्याच पाणीटंचाईची मोठी समस्या


सध्या राज्यात मोठ्या प्रमाणात तापमानात वाढ झाली आहे. राज्यातील बहुतांश जिल्ह्यात तापमानाचा पारा हा 40 अंशाच्या पुढे गेला आहे. त्यामुळं अनेक ठिकाणी पाणीटंचाईची समस्या निर्माण झाली आहे. नागरिकांसह जनावरांच्या पाण्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच शेतकऱ्यांची उभी पिकं करपू लागली आहेत. त्यामुळं सर्वजन पावसाची वाट पाहत आहेत. मागील वर्षी कमी पाऊस झाला होता. त्यामुळं सध्या धरण, तलाव, नदी नाले यामधील पाणीसाठी मायनसमध्ये गेला आहे. त्यामुळं पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली आहे. याच मुद्यावरुन विरोधक सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका करत आहेत. 


महत्वाच्या बातम्या:


Yashomati Thakur: सत्ताधाऱ्यांकडून महाराष्ट्राचा बिहार करण्याचा प्रयत्न; आमदार यशोमती ठाकूर यांची संतप्त प्रतिक्रिया