Loksabha Election 2024: भारतीय जनता पक्षानं (BJP) पुढील वर्षी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीची (Lok Sabha 2024) तयारी सुरू केली आहे. या पार्श्‍वभूमीवर भाजपनं आपले प्रतिस्पर्धी काँग्रेस (Congress) नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना निवडणुकीच्या मैदानात कोंडीत पकडण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. भाजपनं शुक्रवारी सांगितलं की, ते केरळमधील त्यांच्यासोबत युतीत असलेला पक्ष भारत धर्म जन सेना (बीडीजेएस) कडून वायनाड लोकसभेची (Lok Sabha Electipns 2024) जागा घेतील आणि त्याठिकाणी आपला उमेदवार उभा करतील. म्हणजेच, भाजप अमेठीप्रमाणेच 2024 मध्ये राहुल गांधींना वायनाडमध्येही घेरण्याच्या तयारीत आहे, एवढं मात्र नक्की.         


भाजप केरळचे अध्यक्ष के. सुरेंद्रन यांनी सांगितलं की, राहुल गांधी किंवा काँग्रेसचे इतर कोणतेही ज्येष्ठ नेते वायनाडमधून निवडणूक लढवत असले तरी यावेळी भाजप या जागेवरून आपला उमेदवार उभा करेल. सध्या ही जागा त्यांचा मित्रपक्ष बीडीजेएसकडे आहे, मात्र त्यातून ही जागा घेण्याबाबत चर्चा सुरू आहे. प्राथमिक स्तरावरील चर्चा यशस्वी झाली आहे.              


2019 मध्ये बीडीजेएस तिसऱ्या क्रमांकावर 


BDJS राज्य अध्यक्ष तुषार वेल्लापल्ली हे SNDP योगमचे सरचिटणीस वेल्लापल्ली नटेसन यांचे पुत्र आहेत, जे प्रमुख हिंदू एझावा सेमुदायाचे प्रतिनिधित्व करतात. 2019 मध्ये त्यांनी वायनाडमध्ये राहुल यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. 78,816 मतं मिळवून ते तिसऱ्या स्थानावर राहिले, तर राहुल गांधी यांनी 7,06,367 मतं मिळवून विजय मिळवला.


मोठ्या नेत्याला मैदानात उतरवण्याची तयारी  


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतीय जनता पक्ष काही राष्ट्रीय नेत्यांसह अनेक वरिष्ठ नेत्यांचा विचार करत आहे, ज्यांना वायनाड जागेसाठी राहुल गांधी यांच्या विरोधात उभं केलं जाऊ शकतं. एकंदरीत अमेठीप्रमाणेच आता वायनाडमध्येही राहुल गांधींना घेरण्यासाठी भाजपनं कंबर कसली आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि भाजपचे इतर अनेक राष्ट्रीय स्तरावरील नेते केंद्र सरकारच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी वायनाडला भेट देत आहेत. 2019 च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधी यांनी अमेठी आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. स्मृती इराणी यांनी राहुल गांधींचा अमेठीमधून पराभव केला होता. तर वायनाड मतदारसंघातून स्मृती इराणी विजयी झाल्या होत्या.


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


CISF : हिंदी राष्ट्रीय भाषा नाही, गोवा विमानतळावर तामिळ महिलेसोबत CISF कर्मचाऱ्याच्या असभ्य वर्तनावर स्टॅलिन भडकले